

पाथर्डी: आमदार शिवाजी गर्जे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार गर्जे ,पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भीमराव फुंदे, अॅड. अंकुश गर्जे, तालुकाध्यक्ष रणजित बेळगे, शहराध्यक्ष धन्यकुमार गुगळे आदी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते तालुक्यातील पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक विलास रोडी व दत्तात्रय टेंभूरकर यांच्यासह काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष राहुल ढाकणे, युवा नेते मुन्ना पठाण यांचा प्रवेश पालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
शिवसेनेचे नेते तथा तोंडोळीचे सरपंच सतीश वारुंगळे, सोनुशीचे माजी सरपंच संजय दौंड, रामदास दौंड, जिरेवाडीचे माजी सरपंच भीमराव आंधळे, सामाजिक कार्यकर्ते भागवत दौंड, विजय आंधळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिरसाटवाडी येथील युवा कार्यकर्ते रामनाथ खाडे, नितीन शिरसाठ, बाळासाहेब शिरसाठ, हरिभाऊ शिरसाठ, रोहन चव्हाण, आकाश पालवे, प्रकाश वायभासे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले .याव्यतिरिक्त सुवर्णकार सेवा संस्था जिल्हाध्यक्ष सुरेश कुलथे, भालगावचे अरुण काशीद,नंदकिशोर कोलते, कानिफ भडके, हनुमंत बडे हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.
या प्रत्येक कार्यकर्त्याला भेदभाव न करता सन्मानाची वागणूक दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्त्यांनी लागावे असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले.