Land Fraud Case: १४ कोटींच्या जमीन फसवणूक प्रकरणात माजी नगरसेवकासह दोघे अटकेत

न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

नगर: जमीन खरेदीसाठी खोटी कागदपत्रे, बनावट माणसे उभी करून साठेखत, इसार पावत्यांद्वारे १४ कोटी ६६ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व महेश कुऱ्हे या दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जमीन व्यवहारात सुमारे १४ कोटी ६६ लाखांची फसवूणक झाल्याची फिर्याद डॉ. अनिल आठरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. त्या गुन्ह्याच्या तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

Arrest
Shani Shingnapur Prasadalaya: शनिशिंगणापूरचे 'प्रसादालय' आजपासून पुन्हा सेवेत

घोडेगाव, खोसपुरी, पांढरी पूल, सावेडी, लोणावळा येथे वादातील प्लॉट दाखवून त्याची साठे खत करून देणे, त्याच्या इसार पावत्या करून देणे. साठेखत करण्यासाठी बनावट व्यक्तीला उभे करून वारंवार फिर्यादी यांच्याकडून सुमारे १४ कोटी ६६ लाख रुपये उकळले, असे फिर्यादीत म्हटले.

या गुन्ह्यात तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी १४ जून रोजी गुन्ह्यातील मुख्य आरोपी अमोल बबन जाधव (वय ४० रा. मोरगव्हाण, ता. नेवासा) याला अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Arrest
Electric Shock Incident: विजेच्या धक्क्याने सोनईत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू

या गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल शिंदे मोक्कामध्ये नाशिक कारागृहात असल्याने कायदेशीर प्रक्रिया करून त्याला आज ताब्यात घेण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने वरील दोघांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी आरोपी अमोल जाधव यांचा न्यायालयास ताबा मागितला. न्यायालयाने त्यास मंजुरी दिली असून, उद्या त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तीनही आरोपींना समोरासमोर बसून पोलिस तपास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news