Kopargaon Road Development: कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर; ग्रामीण भागातील दळणवळणाला मिळणार गती

कोपरगाव-धारगाव, कुंभारी-कोळपेवाडी-शहाजापूर रस्त्यांचे होणार सुधारणा काम; सुमारे पाच किलोमीटर रस्त्यांचा कायापालट होणार
Road Development
Road DevelopmentPudhari
Published on: 
Updated on: 

कोपरगाव: तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दळणवळण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोपरगाव - धारगाव, कुंभारी - कोळपेवाडी -शहाजापूर या रस्त्यांच्या सुधारण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Road Development
Mahatma Phule Agriculture University: महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशात अव्वल; १२१ संशोधित पीक वाणांची नोंदणी, राष्ट्रीय स्तरावर गौरव

या निधीतून सुमारे ५ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा काम होणार असून, यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल निधीसाठी आ. कोल्हे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केलेला होता.

Road Development
Nagwade Sugar Factory Audit Report: नागवडे साखर कारखान्याच्या लेखापरीक्षण अहवालावरून वाद; अध्यक्ष, कार्यकारी संचालकांना कारणे दाखवा नोटीस

तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था दूर व्हावी, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणारी दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. या मागणीची दखल घेत रस्ते विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.

Road Development
Ahilyanagar Social Welfare Department: अहिल्यानगरच्या समाजकल्याण विभागात लाचखोरीचे जाळे? निरीक्षकाच्या अटकेनंतर अन्य अधिकारीही रडारवर

केंद्रीय रस्ते निधीच्या माध्यमातून हा रस्ते विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ग्रामीण भागाच्या विकासात रस्ते हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. चांगल्या रस्त्यांमुळे केवळ प्रवास सुलभ होत नाही, तर शेतमालाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक, विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास, रुग्णांना वेळेत उपचार मिळणे तसेच ग्रामीण भागातील व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढण्यासही मदत होते. त्यामुळे या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील गावांच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया आ. कोल्हे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.