

कर्जत : शहर व परिसरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीला केवळ मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा देखावा केला होता. मात्र, मुसळधार पावसाने तो मुरूम वाहून गेला आणि पुन्हा मोठमोठे खड्डे तयार झाले. नागरिकांचा जीव धोक्यात येत असताना या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 26) अनोखे आंदोलन माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेे. (Latest Ahilyanagar News)
या आंदोलनात अभय बोरा, अजय भैलुमे, भूषण ढेरे, रजाक झारेकरी, नामदेव थोरात, अफ्ताफ सय्यद, रघूआबा काळदाते, ऋषिकेश धांडे, राजेंद्र पवार, महेंद्र थोरात ,सागर सुर्वे, रमेश कचरे, रोहन कदम ,मनोज गायकवाड, फैज सय्यद, महादेव खंदारे, शुभम चांगण, मुन्ना ढवळे, अभिजित महामुनी, प्रतीक ढेरे, चंद्रकांत पठाडे, बाबा भिसे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत. यामध्ये अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, कर्जत शहरांत कर्जत राशीन रोड, मेन रोड, कुळधरण रोड या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. दीडशे कोटी रुपये खर्चून कर्जत शहरांमध्ये जाणारा मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्याचा अंदाज न आल्याने शाळकरी मुले-मुली, वृद्ध महिला, पुरुष, वाहनचालक यामध्ये पडून जखमी झाले आहेत. चारचाकी वाहने खड्ड्यांमध्ये आदळल्याने अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.
काही प्रवासी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या रस्त्याच्या कडेला गटारी बांधल्या. त्यामधून पाणी जात नाही. देखभालीची जबाबदारी ठेकेदारावर आहे. मात्र, ते काहीच करीत नाही. त्रास मात्र जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे गांधीगिरी करून आंदोलन केले. पुढचे आंदोलन गांधीगिरीचे राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.
यावेळी अभय बोरा, ऋषिकेश धांडे, व रघूआबा काळदाते यांनी बांधकाम अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात
कर्जत ः शहरातील मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वृक्षारोपण करून गांधीगिरी केली. (छाया ः गणेश जेवरे)