Undri fire cylinder blast: उंड्रीतील १४ मजली इमारतीत भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, पंधरावर्षीय मुलाचा मृत्यू

दोन अग्निशमन जवानांसह पाच जण जखमी; स्थायी अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे उघड
Undri fire cylinder blast
उंड्रीतील १४ मजली इमारतीत भीषण आगPudhari
Published on
Updated on

पुणे : उंड्री येथील जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल सोसायटी या चौदामजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील सदनिकेत दुपारी अचानक भीषण आग लागली. आगीत पंधरावर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर दोन अग्निशमन जवानांसह पाच जण गंभीर जखमी झाले. लागलेली आग अन्‌‍ त्यात झालेल्या सिलिंडरचा स्फोट, यामुळे परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी (दि. 26) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. (Latest Pune News)

काही क्षणातच आगीचे रौद्ररूप पाहून नागरिकांनी तत्काळ इमारत खाली केली. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर पाच अग्निशमन गाड्या, दोन टँकर, बीए सेट व्हॅन, उंच शिडीचे वाहन आणि शासकीय 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत असतानाच स्वयंपाकघरात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण इमारत हादरली. जखमींमध्ये अग्निशमन दलाचे जवान विश्वजित मधुकर वाघ (रा. कोंढवा बुद्रुक) व पृथ्वीराज परमेश्वर खेडकर (रा. कोंढवा खुर्द) यांचा समावेश असून, तीन स्थानिक नागरिक देखील जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.

Undri fire cylinder blast
Eknath Shinde: कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान, पुण्यात म्हणाले, निर्णय नक्कीच घेणार!

आगीवर नियंत्रण मिळविणाऱ्या जवानांनी आत प्रवेश केल्यानंतर एका पंधरावर्षीय मुलाला गंभीर अवस्थेत बाहेर काढले. मात्र, वैद्यकीय उपचारांआधीच त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण सदनिका जळून खाक झाली असून, इतर मजल्यावर आग पसरू न देता जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले.

इमारतीच्या ‌’ब‌’ मजल्यावर आग होती. सर्व लाइट बंद कराव्या लागल्यानंतर जवानांना 12 मजले चढत वर जावे लागले. या इमारतीमधील स्थायी अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचे आढळले आहे. या दुर्लक्षाबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी आपल्या इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत ठेवणे हीच खरी सुरक्षितता आहे.

देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news