

पारनेर: पठार भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व चाळीस वर्षे प्रलंबित असलेल्या कान्हूरपठार उपसा सिंच पामीयोजनेच्या सर्वेक्षणास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी परवानगी दिली. याचा प्रारंभ माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत (दि.28 रोजी दहा वाजता कान्हूरपठार(येथील मुख्य चौकात होणार आहे, अशी माहिती भाजप नेते विश्वनाथ कोरडे यांनी दिली.
कोरडे म्हणाले, पर्यटनासह विविध योजनेंतर्गत पठार भागावर निधी उपलब्ध करण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (Latest Ahilyanagar News)
दर्या येथील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या दर्याबाई देवस्थान विकास आरखड्यास 9 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन याच दिवशी नऊ वाजता देवस्थान परीसरात होणार आहे. दुपारी 12 वाजता किन्ही येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेच्या अंतर्गत सौरप्रकल्पाचे भूमिपूजन माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजप कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वनाथ कोरडे युवा मंच, राहुल शिंदे मित्र मंडळाने केले आहे.