

राहुरी: राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील ग्रामसभेत गणेशोत्सव डीजे मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक ऐक्य आणि शांततेचा विचार करून गणेशोत्सव काळात डीजे व ध्वनीप्रदूषण करणारी साधने वापरण्यास सक्त मनाई करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेने मंजूर केला.
सरपंच मनिषा अप्पासाहेब तमनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेस ग्रामसेवक भाऊसाहेब पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
ग्रामस्थ, युवक मंडळे आणि महिलांनी डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना होणारा त्रास तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्भवणार्या अडचणीबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या संमतीने डीजे बंदीचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ठरावाचे काटेकोरपणे पालन करावे, उल्लंघन करणार्यां विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला.
या ठरावामुळे आजपासून सुरू होणार गणेशोत्सव तमनर आखाडा येथे पारंपारिक पद्धतीने, ढोल-ताशांच्या गजरात व सांस्कृतिक-धार्मिक वातावरणात उत्साहाने साजरा केला जाणार असल्याचे गावकर्यांनी सांगितले.