Job Fraud: नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांचा गंडा! सोनईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट जॉइनिंग लेटर देऊन घेतले लाखो; सोनई पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा
Job Fraud
Job FraudPudhari
Published on
Updated on

सोनई : सोनई परीसरातील दोघांची बनावट कागदपत्रे दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर व नेवासा येथील दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Job Fraud
Property Tax: मालमत्ता कर वाढीचा गैरसमज दूर; महापालिकेचे स्पष्टीकरण

राहुल सुनील गडाख (वय 28) यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनिकेत गायकवाड (रा. उस्थळ दुमाळा) याने सन 2024 मध्ये अतुल अनिल दोडके (रा. निपाणी वडगाव ता. श्रीरामपूर) याच्याशी माझी व माझा मित्र ऋषिकेश कैलास इलक यांची ओळख करून दिली. बेलापूर-पनवेल महानगरपालिका येथे माझा वशिला असून तेथे नोकरीस लावण्याचे एकाचे 5 लाख रुपये लागतील, असे सांगितले अनिल व अनिकेत या दोघांनीही विश्वास संपादन करून 3 फेब्रुवारी 2024 पासून फोन पे व रोख स्वरूपात पाच लाख रुपये घेतले.

Job Fraud
Flood Relief Donation: १५ टन पशुखाद्य, १० हजारांसाठी कपडे; ‘घर-घर लंगर’ची पूरग्रस्तांना मोठी मदत

ऋषिकेश कैलास इलग (रा . मोरेचिंचोरे, ता. नेवासा) याचीही माझ्यासारखेच पाच लाख रुपये अतुल दोडके याने घेतले असून आमचे दोघांचे मिळून 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नोकरी संदर्भात विचारले असता दोघांनी उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे जॉइनिंग लेटर दिले. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, येथे कोणतीच भरती नाही, असे सांगण्यात आले. जॉईन लेटर हे खोटे आहे, असे सांगितले

Job Fraud
Newasa Nagar Panchayat Election: नेवाशात नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत!महायुती विरुद्ध अजितदादा, क्रांतीकारी व इंदिरा काँग्रेस आमने-सामने

नवी मुंबईच्या महानगरपालिकेचे सहायक आयुक्तांच्या स्वाक्षरीचे कायमस्वरूपी कर्तव्यावर हजर करून घेतले. बाबतचा लेटरहेडचे छायांकित प्रती सादर केल्या आहेत. या फिर्यादीवरून अतुल अनिल दोडके व अनिकेत गायकवाड या दोघांंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे पुढील तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news