Property Tax: मालमत्ता कर वाढीचा गैरसमज दूर; महापालिकेचे स्पष्टीकरण

नवीन-जुने बांधकाम बदलांवर खास नोटिसा; करदर वाढलेले नाहीत
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

नगर : अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील इमारतीचे वाढीव वय, नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम, इमारतीच्या वापरातील बदल यासह इतर बदल झालेले आहे, अशा मालमत्ताधारकांना प्रस्तावित नवीन करयोग्य मूल्याच्या सुधारीत खास नोटीस वाटपाचे कामकाज सुरु आहे. सदर नोटीसमध्ये करयोग्य मूल्य दर्शविलेले असून तो मिळकतीचा कर नाही. तो करनिर्धारित करण्यासाठी असणारे करयोग्य मूल्य आहे.

Property Tax
Flood Relief Donation: १५ टन पशुखाद्य, १० हजारांसाठी कपडे; ‘घर-घर लंगर’ची पूरग्रस्तांना मोठी मदत

मात्र, मिळकतधारकांनी करयोग्य मुल्यास मालमत्ता कराचे बिल असल्याचा चुकीचा समज करून घेतल्याचे दिसत आहे. या नोटिसा मिळकत कराच्या नाहीत, करयोग्य मूल्याच्या आहेत. त्यावर अधिनियमानुसार 27 टक्के सर्वसाधारण कर व इतर कर आकारण्यात येत असतात. त्यामुळे नागरिकांनी, मालमत्ताधारकांनी या नोटिसांबाबत गैरसमज करू नये. मालमत्ता कर आकारणी विभागात संपर्क साधून माहिती घ्यावी, काही शंका अथवा चूक असल्यास हरकत घ्यावी, तशी सुविधा उपलब्ध असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

Property Tax
Newasa Nagar Panchayat Election: नेवाशात नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत!महायुती विरुद्ध अजितदादा, क्रांतीकारी व इंदिरा काँग्रेस आमने-सामने

अहिल्यानगर महानगरपालिका व मे.सि. ई. इन्फो सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महानगरपालिका हद्दीतील इमारती व मोकळ्या जागांच्या सर्वेक्षणाचे कामकाज सन 2024-2025 पासून सुरु करण्यात आलेले होते.

सर्व्हेक्षणाचे काम प्रगतिपथावर असून सर्व्हेक्षणाचे कामकाज पूर्ण झालेल्या भागातील मिळकतीच्या मालमत्ता कर आकारणीची सुधारित खास नोटीस वाटपाचे कामकाज सुरू आहे. यात महानगरपालिकेने मालमत्ताकराच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. मालमत्ताधारकांना देण्यात आलेल्या सुधारित खास नोटीसमध्ये प्रस्तावित करयोग्य मूल्यावरकरिता हरकत घेण्याचे अधिकार प्राप्त आहेत. अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 1 ते 4 येथे सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत जिथे मिळकत अस्तित्वात आहे, त्या प्रभाग कार्यालयात हरकती स्वीकारण्यात येत आहेत.

Property Tax
Kopargaon Election: कोपरगाव कोणाचे? आठ उमेदवार रिंगणात

प्रत्येक हरकत घेणाऱ्या मिळकतधारकाच्या अर्जाची सुनावणी घेऊन त्यांचे समक्ष म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर अंतिम कर आकारणीचे मागणी बील कायम आकारण्यात येणार आहे. मिळकतधारकांची प्राप्त सुधारीत खास नोटीसबाबत कुठलीही शंका असल्यास मालमत्ता कर आकारणी विभाग येथे समक्ष संपर्क करू शकतात. मालमत्ताधारकांनी करयोगी मूल्याच्या महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या नोटीसा स्वीकारून त्याची माहिती घ्यावी व पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Property Tax
Rahuri Election: तनपुरेंच्या आघाडीशी विखे-कर्डिलेंचा सामना

या नोटिसांबाबत चुकीची माहिती पसरून नागरिकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी कोणालाही शंका असल्यास त्यांनी मालमत्ता कर आकारणी विभागात संपर्क साधावा, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news