

बोधेगाव: शनिवारी (दि. 13) दिवसभर व रात्रभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाचे नियमित 18 दरवाजे 4 फुटांनी, तर आपत्कालीन नऊ दरवाजे दीड फुटांनी असे 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात एक लाख पंधरा हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये, तसेच नाशिक व नगर जिल्ह्यांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. सध्या धरण 100 टक्के भरले आहे. (Latest Ahilyanagar News)
जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक एक लाखापेक्षा जास्त असून, पावसामुळे गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग दीड लाखापेक्षा जास्त जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरी नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असा इशारा जायकवाडी धरण प्रशासन पाटबंधारे विभागाने दिला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या आवक लक्षात घेऊन गोदावरीत पाण्याच्या विसर्ग कमी जादा होण्याची शक्यात प्रशासनाने दिली आहे.