Ahilyanagar
जवळ्याची ग्रामसभा Pudhari

Ahilyanagar: अतिक्रमणांवरून संतप्त ग्रामस्थांनी धरले सरपंचांना धारेवर

जवळ्याची ग्रामसभा गाजली
Published on

जवळा: पारनेर तालुक्यातील जवळा येथील ग्रामसभा अतिक्रमणांच्या मुद्यावरून चांगीच गाजली. संतप्त ग्रामस्थांनी या प्रश्नावरून सरपंच अनित आढाव यांना जाब विचारला. त्यावर ते निरुत्तर झाल्या.

चार दिवसांपूर्वी नुकत्याच विठ्ठलमंदिर संस्थेच्या सभागृहात सरपंच अनिता आढाव यांच्या अध्यक्षते खाली ग्रामसभा झाली. गावातील वाढत्या अतिक्रमणां विषयी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक, सदस्यांना जाब विचारला.त्याला कुणीच समर्पक उत्तरे देऊ शकले नाही. अतिक्रमणांना गावातील पदाधिकारीच जबाबदार असल्याचे नागरिकांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

अतिक्रमणांमुळे गावातील अंतर्गत रस्ते संपुष्ठात येऊ लागले आहेत चारचाकी वाहने व दळणवळण अडचणीचे झाले आहे .बैल घाटावर जाण्यासाठी अतिक्रमणधारकांनी रस्ता देखील ठेवला नसल्याचे बाबाजी लोखंडे यांनी सांगितले, गाव अतिक्रमणांच्या विळख्यात सापडण्याअगोदर तरी वाचवा, अशी हाक काहींनी ग्रामसभेत दिली. परंतु तरीही सरपंच व सदस्य यांनी यावर कोणताही ठोस निर्णय गेल्या पाच सहा वर्षांत नं घेतल्याने आणखी अतिक्रमणे वाढतच चालली आहेत. त्याचा त्रास आता गावाला पर्यायाने नागरिकांना दररोज होऊ लागला आहे.

Ahilyanagar
Ahilyanagar Zp: गुरुजींची 125 गुणांची ‘पुरस्कार परीक्षा’ पूर्ण; यंदा तीनही वर्षांचे ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ वितरण

ग्रामसभेत अनेकवेळा विषय होऊनही निर्णय मात्र काही होत नसल्याने ग्रामपंचायत च्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव सालके यांनी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराचा ग्रामसभेत पाढाच वाचला.अनेक ग्रामस्थ आक्रमक होऊन बोलत होते. परंतु सरपंच मात्र समर्पक उत्तरे देऊ नं शकल्याने ग्रामस्तानी सभात्याग केला.

तहसीलदारांकडेही तक्रारी करूनही अतिक्रमणांवर तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. गावातील चुकीचे राजकारण च अतिक्रमणास पोषक असल्याचे सुज्ञ नागरिक बोलत आहेत. गावातील राजकारणी ज्याच्या त्याच्या सोयीनुसार राजकारण करीत आपलं घर भरून घेण्यात पटाईत झाले आहेत.

Ahilyanagar
Pandharipul Road Closure: महत्त्वाची बातमी! पांढरीपूल-मिरी-शेवगाव रस्ता उद्या राहणार बंद; हा आहे पर्यायी मार्ग

मग ग्रामसभा घेताच कशाला?

ग्रामस्थांनी प्रश्न विचारले तर ते गांभीर्याने घेतले जात नाहीत, असाही आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. त्यामुळे ठोस निर्णय होत नसतील तर ग्रामसभा घेता कशाला? असाही प्रश्न काही सजग ग्रामस्थांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news