Indian Oil Pipeline: शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ‘इंडियन ऑईल’चे नाव? नगर तालुक्यात विरोध; आंदोलनाचा इशारा

वाहिनीसाठी अत्यल्प पीक नुकसानभरपाई दिल्याचा दावा; ‘इतर हक्क’ सदरी कंपनीची नोंद करू नये, तहसीलदारांकडे मागणी
Ahilyanagar Farmer Protest
Ahilyanagar Farmer ProtestPudhari
Published on
Updated on

नगर तालुका: नगर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून इंडियन ऑईल कंपनीची वाहिनी गेलेली आहे. या वाहिनीसाठी शेतकऱ्यांना यापूर्वी अत्यल्प पीक नुकसानभरपाई देण्यात आली असून, आता त्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ सदरी ऑईल कंपनीचे नाव नोंदविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सातबाऱ्यावर ऑईल कंपनीचे नाव दाखल करू नये, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Ahilyanagar Farmer Protest
Belwandi Police Raid: बेलवंडी पोलिसांच्या छाप्यावरच संशय; बिंगो-मटका अड्ड्यावर कारवाई का नाही?

निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुक्यातील अकोळनेर येथील ऑईल डेपोसाठी परिसरातील नांदगाव, शिंगवे नाईक, इस्लामपूर, निंबळक, देहरे, विळद, पिंपरी घुमट, हमीदपूर, निमगाव वाघा, अकोळनेर, चास, खंडाळा, बाबुर्डी घुमट, वाळकी, इसळक, निंबळकसह अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमधून वाहिनी टाकण्यात आली आहे. त्या वेळी संबंधित शेतकऱ्यांना सुमारे चार ते सहा हजार रुपये प्रतिगुंठा या प्रमाणात पीक नुकसानभरपाई देण्यात आल्याचे कार्ले यांनी सांगितले.

Ahilyanagar Farmer Protest
Jamkhed Crime: ‘बॉम्ब टाकून दवाखाना उडवून देईन’; नान्नज आरोग्य केंद्रात डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी

वाहिनी टाकण्यास शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यावेळी वाहिनी गेलेल्या क्षेत्राची सातबारा उताऱ्यावर कोणतीही नोंद केली जाणार नाही, असे संबंधितांकडून सांगण्यात आले होते. तसेच केवळ संबंधित १८ मीटर क्षेत्रात कूपनलिका, विहीर व पक्के बांधकाम करण्याबाबत निर्बंध राहतील, असे जनसुनावणी दरम्यान स्पष्ट करण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

Ahilyanagar Farmer Protest
Ahilyanagar Industrial Investment: अहिल्यानगरात १३ हजार कोटींची गुंतवणूक! ७८ उद्योगांशी करार; औद्योगिक विकासाला नवी झेप

सध्या जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित जमिनींच्या सात-बारा उताऱ्यावरील इतर हक्क सदरी इंडियन ऑईल कंपनीचे नाव नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर कार्लेंसह शेतकऱ्यांनी निवेदन देऊन नोंदीला तीव्र हरकत घेतली आहे.

Ahilyanagar Farmer Protest
Karjat Farmers Protest: सहा गावांचा वीजपुरवठा विस्कळीत; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

...अन्यथा आंदोलनाचा इशारा!

सात-बारा उताऱ्यावर इंडियन ऑईल कंपनीचे नाव दाखल करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रत्यक्ष नोंद केली, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदेश कार्ले, रामदास भोर, भारत फलके, साहेबराव कांडेकर, विकास कांडेकर, प्रसाद कांडेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.

इंडियन ऑईल कंपनी ही व्यावसायिक संस्था असून, ती स्वतःचा नफा-तोटा पाहते. वाहिनीसाठी शेतकऱ्यांना आधीच अत्यल्प मोबदला मिळाला आहे. अशा परिस्थितीत सात-बाऱ्यावर कंपनीचे नाव दाखल झाल्यास भविष्यात शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वापरावर विविध प्रकारचे निर्बंध येण्याची भीती आहे.

संदेश कार्ले, माजी जि. प. सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news