

2 lacs stolen from trunk of a four-wheeler
राहुरी : राहुरी शहर हद्दीत नगर-मनमाड रोडवर असलेल्या हॉटेल कुबेरसमोर उभा असलेल्या चारचाकी वाहनाच्या डिक्कीतील दोन लाख रुपये रोख रक्कम हेल्मेट घालून आलेल्या एका भामट्याने पळवून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.
मोहीत प्रविण नेब हे श्रीरामपूर तालुक्यातील थत्ते मैदान जवळ राहतात. ते सरकारी ठेकेदार आहेत. दि. 20 मे रोजी सकाळी मोहित नेब हे त्यांची चारचाकी कार व्हर्टर क्र. एम एच 17 सी एक्स 1251 मध्ये बसून अहिल्यानगर येथे कामानिमीत्त गेले होते. तेव्हा त्यांच्या गाडीच्या डिक्कीत काळ्या रंगाच्या बॅगमध्ये 2 लाख रुपये रोख रक्कम ठेवलेली होती.
रात्री 11.30 वाजेच्या सुमारास मोहित नेब हे श्रीरामपुरकडे जात असताना राहुरी शहर हद्दीत नगर-मनमाड रोडवर असलेल्या हॉटेल कुबेरसमोर गाडी लावून जेवण करुन गाडीत झोपले. तेव्हा त्यांच्याकडुन गाडी लॉक करायची राहुन गेली होती. दि. 21 मे रोजी पहाटे 3.30 वाजे दरम्यान मोहित नेब यांना जाग आली तेव्हा ते गाडी चालू करुन श्रीरामपूर येथे त्यांच्या घरी गेले. सकाळी त्यांनी गाडीच्या डिक्कीमधी बॅग तपासून पाहिली असता त्यामधील 2 लाख रुपये चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हॉटेल कुबेर येथे जाऊन तेथील सीसीटिव्ही फुटेज तपासले. तेव्हा ते हॉटेल कुबेर समोर गाडी लावून झोपले असताना मोटरसायकलवर हेल्मेट घालून आलेला एक अज्ञात भामटा गाडीची डिक्की उघडताना कॅमेर्यात दिसून आला.
मोहीत प्रविण नेब यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.