Illegal Sex Determination Case: गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक; आरोपी डॉक्टरांची संख्या आठवर

शिरूरमधील बीएएमएस डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात; न्यायालयाकडून आठ दिवसांची पोलिस कोठडी, तपासाची व्याप्ती वाढली
Fetal Determination
Fetal DeterminationPudhari
Published on
Updated on

नगर: अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात श्रीरामपूर पोलिसांनी शिरूरमधून आणखी एका डॉक्टरला अटक केली. अटकेतील या डॉक्टरला न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Fetal Determination
Sugar Factory Election Voting: वृद्धेश्वर व मुळा कारखाना निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; निकालाकडे सर्वांचे लक्ष

ज्ञानेश्वर नायकोडी (बीएएमएस, शिरूर, पुणे) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. पिंपरी निर्मळ शिवारात अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश करत पोलिसांनी डॉक्टर, मेडिकल चालक, पुरवठादार व महिलांच्या नातेवाईकांना अटक केली होती.

Fetal Determination
Banned Agricultural Medicines: श्रीरामपूरात २७ कंपन्यांच्या ३५० शेती औषधांच्या विक्रीवर बंदी

या प्रकरणात सामील असलेल्या अनेक एजंटांनाही अटक करण्यात आली. तपासात गुन्ह्यांची व्याप्ती वाढतच आहे. डॉ. नायकोडी यास अटक केल्यानंतर राहाता न्यायालयाने त्यास ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावाली.

Fetal Determination
sangamner water scarcity: संगमनेरात टँकर सुरू ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह; मुदत जून अखेरच

डॉ. नायकोडी हा गर्भवती महिलांची तपासणी करत होता, गर्मवती महिला तपासणीला नेमके कोण पाठ:वत होते.?किती महिलांच्या गर्भलिंग निदान चाचण्या केल्या आणि किती गर्भपात केले? याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने कोठडी सुनावली.

Fetal Determination
Water Issue: नगरसेवकांचा महापालिकेत ठिय्या; आगरकर मळ्यात पाणीपुरवठा विस्कळित

अटकेतील डॉक्टरांची संख्या ८ वर

आतापर्यंत या गुन्ह्यात अटकेतील आरोपींची संख्या २४ झाली असून त्यात ८ डॉक्टर आहेत. तिघे मेडिकल चालक तर एक औषध पुरवठादार आहे. आता पर्यंत पोलिसानी सहा सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केल्या आहेत. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news