Akole Minor Mineral Scam: अकोलेत गौणखनिज उत्खनन प्रकरणाची चौकशी; ठेकेदारावर गंभीर आरोप

अकोले तालुक्यात साठवण तलाव खोदकामातून गौणखनिजाची परस्पर विक्री झाल्याचा आरोप करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले
Mining
MiningPudhari
Published on
Updated on

अकोले: तालुक्यातील पिंपळदरावाडी येथील साठवण तलाव कामाचे खोदकाम वर्षापासून सुरू होते. खोदकामात निघालेले दगड, मुरूम ही सर्व गौणखनिज नियमाप्रमाणे साठा करणे बंधनकारक होते. परंतु संबंधित ठेकेदाराने गौणखनिज उत्खनन केल्यानंतर त्याची परस्पर विक्री केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी केला आहे.

Mining
Ashok Kharat: शिर्डी पोलिसांच्या गुन्ह्याला बी समरी; नीरज जाधव प्रकरणात मोठा ट्विस्ट

त्यांच्या तक्रारीनंतर महसूल राज्य मंत्री योगेश कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत दराडे म्हणाले, जलसंधारण विभागाच्या निविदेनुसार हे काम ठेकेदाराला मिळाले होते. संबंधित ठेकेदाराने नियमाप्रमाणे जलसंधारण विभागाच्या परवानगीने केल्या जाणाऱ्या खोदकामाची माहिती महसूल विभागाला कळविणे अपेक्षित होते.

Mining
Ahilyanagar Fake Baba Fraud: भोंदूबाबाकडून 50 हजारांची फसवणूक; मानवी कवटी ठेवून अघोरी विधीचा धक्कादायक प्रकार

सदरचा गौणखनिज साठवण्यासाठी किंवा महसूल विभागाच्या आदेशाने पुढील कार्यवाही होणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. गौणखनिज हे परस्पर कुठल्याही परवानग्या न घेता विक्री करण्यात आले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. महसूल विभागाचे दीड ते अडीच कोटी रुपयांपर्यंतचा बाजारभावाप्रमाणे शासकीय मूल्य व स्वामित्व धन याची एकूण किंमत व नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी शासनाकडे केली होती.

Mining
Maharashtra Storm Damage: जामखेड-आश्वी परिसरात वादळी पावसाचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान

याबाबतचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर राज्याचे गृह, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांना बाजीराव दराडे यांनी दिले आहे. त्यावर मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Mining
Ahilyanagar Illegal Abortion Racket: गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; 13 जण अटकेत

तहसीलदारांनी मागावला गौण खनिज उत्खननाचा मोजणी अहवाल

बाजीराव दराडे यांनी राज्यमंत्री (महसुल) यांचेकडे दि,9 फेब्रुवारी रोजी केलेला अर्जात नमुद केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने मंडलाधिकारी खिरविरे यांनी पंचनामा रिपोर्ट सादर केला आहे. पिंपळदरावाडी हद्दीमध्ये साठवण तलावाचे खोदकाम चालू आहे. अंदाजे 60 ते 65 फुट खोली व अंदाजे 180 ते 200 फूट रुंद खोदकाम केलेले दिसून येते. तरी गौण खनिज उत्खनन केलेल्या ठिकाणची मोजणी करुन मोजणी अहवाल तत्काळ इकडे सादर करावा. मंत्री संदर्भ असल्याने प्राधान्य द्यावे, असे पत्र उप अधिक्षक भुमिअभिलेख विभागाला तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news