Ahilyanagar Fake Baba Fraud: भोंदूबाबाकडून 50 हजारांची फसवणूक; मानवी कवटी ठेवून अघोरी विधीचा धक्कादायक प्रकार

नगरमध्ये गुप्तधनाच्या आमिषाने भोंदूबाबाने कुटुंबाची 50 हजारांची फसवणूक केली. घर पाडायला लावून अघोरी विधी केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली
Human Skull
Human SkullPudhari
Published on
Updated on

नगर: गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदूबाबाने महिलेसह कुटुंबाची 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 11 मे 2026 रोजी उघडकीस आला. दरम्यान, त्या भोंदूबाबाने संबंधित कुटुंबाला स्वतःचे घर पाडण्यास भाग पाडून त्या जागेवर मानवी कवटी ठेवून अघोरी विधीचा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Human Skull
Maharashtra Storm Damage: जामखेड-आश्वी परिसरात वादळी पावसाचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान

शिव अण्णासाहेब सोनवणे (वय 23 रा. रंगभवनजवळ, सर्जेपुरा) असे त्या भोंदूबाबाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची (दि.16पर्यंत) पोलिस कोठडी दिली आहे. याबाबत सोनाली महेश काळोखे (वय 22, रा. रंगभवनजवळ, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, शिव सोनवणे हा परिसरात आघोरी बाबा म्हणून परिचित असून तो अंधश्रद्धा, भोंदूगिरी व जादूटोण्याचे प्रकार करत असल्याची माहिती आहे. फिर्यादींचे वडिलोपार्जित घर हे शिव याच्या घरामागे असून त्या जागेखाली गुप्तधन असल्याचे शिव याने सांगितले.

Human Skull
Ahilyanagar Illegal Abortion Racket: गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; 13 जण अटकेत

5 फेब्रुवारी 2026 रोजी शिव फिर्यादींच्या घरी आला. त्याने तुमच्या घराखाली सोने असून माझ्या आघोरी विद्येच्या साह्याने ते बाहेर काढून देतो, असे सांगून त्यासाठी जादूटोण्याच्या साहित्याकरिता 50 हजार रुपये मागितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादींच्या कुटुंबाने 6 फेब्रुवारी रोजी त्याला रोख 50 हजार रुपये दिले. त्यानंतर शिव याच्या सांगण्यावरून संबंधित कुटुंबाने स्वतःचे घर पाडले. फेब्रुवारी महिन्यात मध्यरात्री शिव याने त्या जागेवर कथित अघोरी विधी केल्याचा आरोप आहे. यावेळी लिंबू, मानवी कवटी, हाडे, हळद-कुंकू, भस्म आदी साहित्य मांडून मोठ्याने मंत्रोच्चार करण्यात आले. त्यानंतर जागा खोदण्यास सांगितले मात्र, कोणतेही गुप्तधन मिळाले नाही.

Human Skull
NEET Paper Leak Arrest: नीट पेपरफुटी प्रकरण; राहुरीतून तरुणाला CBI कडून अटक

त्यानंतर फिर्यादी यांनी शिव सोनवणे याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. सुरुवातीला विधीच्या साहित्यावर पैसे खर्च झाले असे सांगून त्याने वेळकाढूपणा केल्याचे सांगण्यात आले. अखेर 11 मे 2026 रोजी शिव याने मी पैसे परत देणार नाही. ही जागा आता माझी आहे. माझ्या नादी लागलात तर अघोरी प्रयोग करून संपवून टाकीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पेोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा भोंदू शिव सोनवणे यास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ करीत आहेत.

Human Skull
Ahilyanagar Fake Shampoo Factory Raid: नगरमध्ये बनावट शॅम्पू कारखान्याचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद

मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ

भोंदू शिव सोनवणे हा परिसरात अघोरी बाबा म्हणून परिचित आहे. तो भोंदूगिरी आणि जादूटोण्याचे प्रकार करीत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, त्यात अनेक व्हिडिओ आहेत. सर्जेपुरा, रामवाडी, सिद्धार्थनगर परिसरातील अनेक श्रद्धाळू लोक त्याच्याकडे जात होते. त्यांच्याकडून भोंदूगिरी करून पैसे उकळीत असल्याचे समोर आले आहे.

भोंदू शिव सोनवणे यास अटक केली असून तपास सुरू आहे. त्याने आणखी काही लोकांची फसवणूक केली का, याचा तपास सुरू आहे.

डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस उपअधीक्षक

logo
Pudhari News
pudhari.news