Political News: आदिवासींचं आरक्षण काढण्याचं काम हे सरकार कधीही करणार नाही: उपमुख्यमंत्री शिंदे

आदिवासीचे आरक्षण कायम राहिल
Political News
आदिवासींचं आरक्षण काढण्याचं काम हे सरकार कधीही करणार नाही: उपमुख्यमंत्री शिंदेPudhari
Published on
Updated on

अकोले: आदिवासी जल, जंगल, पर्यावरण व जमिनीचा संरक्षणकर्ता असून भूमीपुत्र आहे. घटनेने दिलेलं आदिवासींचं आरक्षण काढण्याचं काम हे सरकार कधीही करणार नसल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जागतिक आदिवासी दिन अकोले बाजार तळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जालिंदर भोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास आ. विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, समन्वयक बाळासाहेब भोर, जिल्हा उपध्याक्ष मारुती मेगाळ, जगन देशमुख, तालुकाध्यक्ष सुशांत गजे, सचिन शेटे, शर्मिला येवले उपस्थित होते.  (Latest Ahilyanagar News)

Political News
Shani Darshan: शनिदर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आदिवासी हमारा गर्व, हमारी शान, देश का स्वाभिमान है. काळ्या आईची ही लेकरं समाजाच्या मुख्य प्रवाहात आली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. शिवसेना हा पक्ष मालक व नोकरांचा नाही तर कार्यकर्त्यांचा असून मी कार्यकर्त्याचेच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडेसह पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

Political News
Pathardi Politics: शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही

रक्षाबंधनाच्या दिवशी होणार्‍या या कार्यक्रमात शमिला येवले यांच्यासह महिलांनी लाडका भाऊ म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बहिणीना शुभेच्छा दिल्या. लाडक्या बहिणीमुळे एकनाथ शिंदे यांना लाडक्या भावाची ओळख मिळाली असून ‘लाडकी बहीण योजना’ कधीही बंद होणार नसल्याचे त्यांनी लाडक्या बहिणींना आश्वासित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news