

पाथर्डी: राज्यात कुठेही गोमातेची हत्या झाली, तर त्याला सरकारच्या माध्यमातून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. केवळ पैशासाठी आमच्या धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा षडयंत्रांना जोरदार प्रत्युत्तर देऊ, असाही इशारा त्यांनी दिला.
पाथर्डी येथे लव जिहादाचे वाढते बळी, गोरक्षक भारत लिपारे यांच्यावर प्राणघातक हल्ला, शहरात गोमांस विक्री आणि अवैद्य कत्तलखान्यांकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्ष, हिंदूंच्या भावना आणि कायद्याची थट्टा, तिसगाव येथील कत्तलखान्यांविरोधात जनआक्रोश मेळावा शहरातील अजंठा चौकात झाला. त्यावेळी आ. पडळकर बोलत होते. या घटनेचा निषेध म्हणून पाथर्डी शहर बंद ठेवण्यात आले होते. (Latest Ahilyanagar News)
पडळकर म्हणाले, आपण हिंदू आहोत आणि हिंदू समाजासाठी काम करणे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची भूमिका असली पाहिजे. गोहत्या बंदीचा कायदा असतानाही कत्तलखाने कसे चालतात? असा सवालही त्यांनी पोलिस प्रशासनाला केला.
जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने तत्काळ बंद करा, अशी मागणी करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोहत्तेबाबत अत्यंत संवेदनशील असून, त्यांनी या विषयावर कठोर भूमिका घेतली आहे. गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणांबाबतही पडळकर यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणावर कारवाई झाली असून, पोलिस प्रशासनाने हीच भूमिका कायम ठेवण्याची गरज आहेे.
आ. राजळे म्हणाल्या, यापुढे गोरक्षकावर हल्ला झाला, तर आम्ही तो सहन करणार नाही. भविष्यात गोरक्षकाची तक्रार आल्यास अधिकार्यांनी ती गांभीर्याने घ्यावी. गोरक्षकावर कोणी खोटा गुन्हा दाखल केल्यास खपवून घेणार नाही.
ठराविक समाजाचे लोक मावा, गुठखा विक्री करीत कत्तलखाने चालवून इतरांना त्रास देत असून अशांना कडक शासन झाले पाहिजे. आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये. शेवगाव शहरात सुद्धा मागे काय घडले आहे, हे सर्वांना माहित आहे. तालुक्यातील कत्तलखाने जेसीबीने उखडून टाका, अशी सूचना केली.
आ. जगताप म्हणाले, लव्ह जिहादबाबत मुलींवर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. गोसेवकांवर जिहादी वृत्तीच्या लोकांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. तथाकथित ’भाईचारा’ दाखविणार्यांचे हे नाटक असून त्यामागे फक्त ढोंग आहे, हे संकुचित राजकारण आहे, असा आरोप त्यांनी केला. प्रास्ताविक मुकुंद गर्जे यांनी, तर आभार अमोल गर्जे यांनी मानले.
अजून जुनीच नावे कशी?
देशभक्त मुस्लिमांविरोधात जिहादी मुस्लिम असा हा लढा आहे. या तालुक्यात बांगलादेशी मुस्लिम कसे आले, याची चौकशी व्हायला हवी. अवघ्या चौदा महिन्यांत नगरचे अहिल्यानगर करण्याचे काम मुखमंत्र्यांनी केले असले तरीही काही शासकीय कार्यालयांवरील अजूनही जुनेच नाव दिसत आहेत, ते काढण्याचे काम प्रशासनाने करावे, असे आमदार पडळकर म्हणाले.