Shirdi Saibaba Temple Donation: साईचरणी सोन्याची छत्री; चेन्नईच्या साईभक्ताचे भक्तीमय दान

शिर्डी संस्थानला 15 किलो वजनाची सोन्याचा मुलामा असलेली छत्री अर्पण; 23 लाखांची देणगीही दिली
साईचरणी सोन्याची छत्री दान
Shirdi Saibaba Temple DonationPudhri
Published on
Updated on

नगर: चेन्नई येथील साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी 185 ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा असलेली 15 किलो वजनाची ताब्याची छत्री श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली.  (Latest Ahilyanagar News)

साईचरणी सोन्याची छत्री दान
Sangamner murder case: प्रेयसीकडूनच प्रियकराची हत्या; संगमनेरमध्ये खुनाचा उलगडा

बुधवारी सकाळी ही छत्री श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर प्रतिष्ठापित करण्यात आली असून, या नव्या छत्रीमुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. याच साईभक्ताने यापूर्वीही श्री साईबाबा संस्थानला चेकद्वारे तब्बल 23 लाख रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती दराडे यांनी दिली. या दानाबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साईभक्त जितेंद्र उमेडी यांचा सत्कार करण्यात आला.

साईचरणी सोन्याची छत्री दान
Swabhimani sugarcane price dispute: ऊसदरावरून संघर्ष! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

साईभक्त जितेंद्र उमेडी यांचे हे दान आणि श्रद्धा भाविकांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या या योगदानातून संस्थानच्या धार्मिक आणि समाजोपयोगी कार्यांना बळ मिळेल, असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news