Ghodegaon Taluka Formation: घोडेगाव, राजूरला होणार अपर तहसील कार्यालय

१३ वर्षांच्या संघर्षानंतर घोडेगाव तालुक्यास अप्पर तहसील मंजुरीच्या दिशेने; राजूर तालुक्याही प्रस्तावात समाविष्ट
Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

नेवासा: घोडेगाव तालुका निर्मितीचा गत तेरा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता फळास येऊ पाहत आहे. राज्यात 69 अतिरिक्त तहसील कार्यालये सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाने विभागीय आयुक्तांकडून पुन्हा एकदा माहिती मागविली आहे. ही माहिती 13 जानेवारीला मागविण्यात आली. त्याचे पत्र ‌‘पुढारी‌’च्या हाती लागले आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Rahuri Wedding Gold Theft Solved: राहुरीत 6 लाखांच्या लग्नातील दागिन्यांची चोरी उघड; मध्यप्रदेशात जाऊन पोलिसांची धडक कारवाई

घोडेगाव या नवीन तालुक्यासाठी सुधीर वैरागर हे 2014 पासून सतत लढत आहे. नेवासा तालुक्यातील 127 पैकी 47 ग्रामपंचायतींनी घोडेगाव तालुका निर्मितीच्या बाजूने ठराव दिले आहेत. पाथर्डी तालुक्यातील रुपेवाडी ग्रामपंचायतीनेही घोडेगाव तालुक्याच्या बाजूने ठरावा दिला आहे.

मोठे बाजारपेठेचे गाव, 34 एकर शासकीय जागा, पाणी, रस्ते, वीज यांसारख्या गोष्टी घोडेगावात उपलब्ध आहेत. कांदा व जनावरांचा बाजार तर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आहे. आता घोडेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार असून त्याची घोषणा कोणत्याही क्षणी होईल, असे सुधीर वैरागर यांनी सांगितले.

Ahilyanagar Municipal Corporation
Madhi Kanifnath Amavasya Darshan: श्री क्षेत्र मढी येथे अमावस्येला लाखोंची गर्दी; चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन

प्रस्ताव एक वर्षापूर्वीच

नेवासा तालुक्यातील घोडेगाव व अकोले तालुक्यातील राजूर येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने जानेवारी 2025 मध्येच शासनाला सादर केला आहे. शासनाने पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे अपर तहसील कार्यालयांची नावे बरोबर आहेत का, अशी विचारणा केली. त्यानुसार घोडेगाव व राजूर ही दोन ठिकाणे बरोबर असल्याचे पत्र शासनाला पाठविले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वी शासनाकडून आलेल्या पत्रानुसार अकोले तालुका आणि अपर तहसील राजूर हे धुळे जिल्ह्यात समावेश केलेले दिसत होते. मात्र अकोले अहिल्यानगर जिल्ह्यात आहे, अशी दुरुस्ती केल्याचे त्यांनी सांगितले. नेवासा तालुक्याची लोकसंख्या 3 लाख 57 हजार 829 इतकी असून, तालुक्यात 128 गावांचा समावेश आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Gram Panchayat Ward Delimitation 2026: अहिल्यानगर जिल्ह्यात 765 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर

मंत्री विखे पाटील यांचीही शिफारस!

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिफारसपत्र शासनाला दिल्याचे समजते. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी यांसारख्या पदांची माहितीही राज्य शासनाकडे गेलेली आहे. अकोले तालुक्यातील राजूरचाही प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयासाठी प्रस्तावात समावेश आहे.

घोडेगावच्या प्रस्तावात...

मंडल कार्यालये : (5) चांदा, सोनई, घोडेगाव, वडाळा बहिरोबा व देडगाव सजे : (27) चांदा, रस्तापूर, देवगाव, कौठा, मोरगव्हाण, सोनई, खेडलेपरमानंद, करजगाव, वंजारवाडी, अंमळनेर, गणेशवाडी, घोडेगाव, शिंगणापूर, शिंगवेतुकाई, पानसवाडी, लोहगाव,वडाळा बहिरोबा, माळीचिंचोरा, खरवंडी, नारायणवाडी, तामसवाडी, हिंगोणी, देडगाव, तेलकुडगाव, माका, महालक्ष्मी हिवरे, जेऊर हैबती. महसुली गावे : (50)

Ahilyanagar Municipal Corporation
Shanishingnapur Bribe Case: शनिशिंगणापूर मंदिरासमोर भाविकांची वाहने पार्क करू देण्यासाठी हप्ता; पोलिस कर्मचारी रंगेहाथ पकडला

राजूरच्या प्रस्तावात...

मंडल कार्यालये : (6) राजूर, साकिरवाडी, वाकी, शेंडी, कोतूळ, खिरविरे. सजे (35) : राजूर, केळुंगण, पिंपरकणे, देवगाव, कातळापूर, पाडाळणे, विठे, चितळवेढे, साकिरवाडी, मवेशी, खडकी बुद्रूक, आंबित, शिरपुंचे बुद्रूक, लव्हाळी ओतूर, वाकी, वारंघुशी, बारी, मान्हेरे, शेणीत बुद्रूक, शेंडी, मुरशत, घाटघर, भंडारदरा, रतनवाडी, कोतूळ, अंभोळ, कोहणे, घोटी, तळे, सातेवाडी, पळसुंदे, खिरविरे, एकदरे, तिरडे, पाडोशी. महसुली गावे : 104.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news