

Ganesh Bhand joins Shiv Sena Shinde group
राहुरी: देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी, हाती शिवधणुष्य घेत, शिवसेनेचे मुख्य नेते, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
विखे समर्थक अशी ओळख असलेले गणेश भांड यांची, शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याबाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती. त्यानुसार प्रवेश सोहळा मुंबईमध्ये मंत्री उदय सावंत यांच्या निवासस्थानी पार पडला. (Latest Ahilyanagar News)
यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, आमदार मनीषा कायंदे, दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाप्रमुख संपत जाधव, पांडुरंग महाराज वावीकर, शहरप्रमुख गंगाधर सांगळे आदी उपस्थित होते.
उप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा पंचा परिधान करुन, गणेश भांड यांचे शिवसेना पक्षामध्ये स्वागत करण्यात आले.
यावेळी संदीप भांड, गोपाल शिंदे, प्रमोद बर्डे, संतोष येवले, संतोष घाडगे, कृष्णा भुजाडी, अर्जुन शेटे, चांगदेव खांदे, सुनील भांड, निलेश कुंभार, प्रतीक घोलप, गौरव भांड, सुमेध भांड, सोमा इथापे, सलीम शेख, कृष्णा कोबरणे, किशोर मोरे, अशोक गावडे, राजेंद्र सांगळे, सीताराम येवले, हरिभाऊ हापसे, रविंद्र बोरुडे, किरण देशमुख आदींसह कार्यकर्ते व शिव सैनिक उपस्थित होते.