अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी गावामध्ये पूरात अडकलेला गावकरी.Pudhari Photo
अहिल्यानगर
Ahilyanagar Flood | अहिल्यानगरमधील खडकी गावात अनेकजण पूरात अडकले; लष्कराला केले पाचारण
लष्कराकडून तातडीने मदतकार्य
पुणे : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी गावात पूर आला आहे. याठिकाणी अनेक रहिवासी पूरात अडकल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले. पूरात अडकलेल्या गावकऱ्यांना लष्कराने यातून बाहेर काढले.
अहिल्यानगरच्या जिल्हा दंडाधिकार्यांकडून लष्कराला मदतीची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे तेथे लष्कराने बाधित भागात बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी एक मदत पथक तातडीने पाठवले. नागरी अधिकार्यांशी संपर्क साधण्यासाठी मदत पथक दुपारी पूरग्रस्त गावात गेले आणि मदतकार्य पूर्ण केले.

