

अहिल्यानगर: क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून तीन हजारांच्या लाच प्रकरणात महिला आरटीओ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. राहात्यात वाळू वाहतूकदाराकडून 15 हजारांचा हप्ता घेताना पोलिस कॉन्स्टेबल लाचेच्या जाळ्यात अडकला. आरटीओ गीता शेजवळ, ईस्माईल पठाण, पो. कॉ. अनिल गवांदे अशी आरोपींची नावे आहेत.(Latest Ahilyanagar News)
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून तीन हजारांच्या लाच प्रकरणात महिला आरटीओ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. राहात्यात वाळू वाहतूकदाराकडून 15 हजारांचा हप्ता घेताना पोलिस कॉन्स्टेबल लाचेच्या जाळ्यात अडकला. आरटीओ गीता शेजवळ, ईस्माईल पठाण, पो. कॉ. अनिल गवांदे अशी आरोपींची नावे आहेत.
पाटस येथून अहिल्यानगरला सिमेंटची ओव्हरलोड गाडी अहिल्यानगरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतून जाऊ देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना खासगी इसम ईस्माईल नवाब पठाण याला ताब्यात घेण्यात आले. लाचेच्या पडताळणीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक गीता भास्कर शेजवळ यांनी खासगी इसम ईस्माईल पठाण याला लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने या दोघांविरोधात भिंगार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पथकानेही ही कारवाई केली.
राहाता पोलिस स्टेशन हद्दीतून खडीचा डंपर पोलिसांनी पकडला होता. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल अनिल रामनाथ गवांदे यांनी खडी, वाळूची वाहतूक करायची असेल तर दर महिन्याला 20 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली होती. या संदर्भात नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार गेली होती. उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनात दि.24 रोजी लाचलुचपत विभागाने पडताळणी केली होती.
यावेळी पोलिस कॉन्स्टेबल अनिल गवांदे यांनी वाळू, खडी, मुुरूम वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी लाच घेण्याची तयारी दर्शवली होती. गुरुवारी (दि. 25) रोजी सापळा लावण्यात आला होता. यामध्ये पो. कॉ. गवांदे यांना 20 हजारांपैकी 15 हजारांची लाच घेताना पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी भिंगार आणि राहाता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.