

बोधेगाव: तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाले, तळे तुडूंब भरून वाहिले असून, अनेक गावात महापुराचे पाणी घुसल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे काहीही करा; परंतु आम्हाला शेतातील उभ्या पिकांचे सरसकट पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्या, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी आ. मोनिका राजळे यांच्याकडे केली. (Latest Ahilyanagar News)
या वेळी बापूसाहेब पाटेकर, भीमराज सागडे, गणेश रांधवणे, तहसीलदार आकाश दहाडदे, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप डोळे, सहायक अभियंता दिनेश माळी, उपअभियंता दत्तात्रय कर्डिले, उपअभियंता आनंद रुपनर, उपविभागीय अधिकारी प्रवीण दहातोंडे, वन विभागाचे वनरक्षक विजय पालवे, बाळकृष्ण बडे, शिवाजी खेडकर, शाखा अभियंता शैलेश साबळे, तुकाराम भिसे, मंडल कृषी अधिकारी तात्यासाहेब दिवटे, मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड, उद्योजक पांडुरंग नवले, भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद फलके, संजय टाकळकर, सचिन वारकड, सुधीर जायभाय, राम केसभट, अस्मानराव घोरतळे, महेश घोरतळे ,राजेंद्र डमाळे,सरपंच अंबादास ढाकणे,पांडुरंग तहकीक आदी उपस्थित होते.
आ. राजळे यांनी तालुक्यातील खरडगाव, आखेगाव, थाटेवाडगाव, अधोडी, दिवटे, गोळेगाव, लाडजळगाव, बोधेगाव, कांबी हातगाव व मुंगी या गावांत जाऊन समक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.