Sangamner Crime: शेतकऱ्यावर चाकूचे वार; सराईत गुन्हेगार झाला पसार

अनिल गणपत आहेर असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
Sangamner Crime
शेतकऱ्यावर चाकूचे वार; सराईत गुन्हेगार झाला पसारPudhari
Published on
Updated on

संगमनेरः तालुक्यातील लोहारेगावात हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुनहेगाराने रस्त्यावरुन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यासह हातावर चाकूचे सपासप वार करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा थरार शुक्रवारी 12 रोजी रात्री 8 वाजता घडला. दरम्यान, हल्ल्यानंतर दोघे आरोपी पसार झाले.

अनिल गणपत आहेर असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुद्धीवर येताच त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक पोकळेसह एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Ahilyanagar News)

Sangamner Crime
Cattle Rescue: कत्तलीसाठी आणलेली 26 जनावरे पकडली; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, अनिल आहेर हे शेतीसह दुधाचा व्यवसाय करतात. दूध टाकण्यासाठी मोटारसायकलवरुन ते जात होते. डेअरीत दूध दिल्यानंतर ते घराकडे परतत होते. यावेळी अवजीनाथ बाबा मंदिरासमोर चौकात मोठ्या प्रमाणात आरडा- ओरडा सुरू होता. गावकरी जमा झाले होते.

दोन तरुण हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करीत होते. यावेळी अनिल आहेर यांनी दुचाकी रस्त्याच्याकडेला उभी करुन, ते गर्दीमध्ये गेले. यावेळी दीपक पोकळे म्हणाला की, ‌‘ये आहेरच्या पोरा तुला लय झालं का, मला विरोध करतो का,‌’ असे म्हणत त्याने डोक्यासह हातावर धारधार चाकूचे सपासप वार केले. ‌‘तुला आज जिवंत सोडणार नाही,‌’ असा दम दिला.

दरम्यान, दुसऱ्या अनोळखी इसमानेही आहेर यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, परंतू तो चुकवून ते पळाले, मात्र दीपक पोकळे याने डोक्यात वार केल्यामुळे आहेर रक्तभंबाळ अवस्थेत चक्कर येऊन पडले. यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. दीपक पोकळेसह मित्राने तेथूण धूम ठोकली.

आहेर यांया कुटुंबियांना मारहाणीची माहिती समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनिल यांना खासगी दवाखान्यात दाखल केले. ते शुद्धीवर येताच पोलिसांनी जबाब घेतले. दीपक पोकळेसह अनोळखी इसमाविरुद्ध खून करण्याचा प्रयत्नांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Sangamner Crime
Ahilyanagar Municipal Eelections: नव्या एरियात शिलेदार खिंडीत?

सराईत गुन्हेगार खुलेआम चाकूचे वार करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करतो. सर्वांसमोर दमबाजी करतो. जमावा पुढून निघून जातो, परंतू पोलिसांना त्याचा तपास लागत नाही. अद्याप आरोपी पकडण्यात तालुका पोलिस अपयशी ठरल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news