Ahilyanagar Fake Shampoo Factory Raid: नगरमध्ये बनावट शॅम्पू कारखान्याचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद

नामांकित ब्रँडच्या बाटल्यांमध्ये केमिकल मिश्रण भरून विक्री करणाऱ्या टोळीवर एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; तीन आरोपी अटकेत
Ahilyanagar Fake Shampoo
Ahilyanagar Fake ShampooPudhari
Published on
Updated on

नगर: केमिकलपासून बनावट शॅम्पू तयार करून, ते नामांकित ब्रँडेड कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून आठवडे बाजारात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 18 हजार 186 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना जेरबंद केले. आरोपी नगरमध्ये बनावट शॅम्पूचा कारखाना थाटल्याचे चौकशी स्पष्ट झाले आहे.

Ahilyanagar Fake Shampoo
Maharashtra OBC Census Demand: ओबीसी जनगणना आणि स्वतंत्र निधीची मागणी; लक्ष्मण हाके यांचा सरकारवर हल्लाबोल

शानमोहम्मद पप्पूखान आलबी (वय 25), रब्बानी रज्जाक अब्बास, फैजान अहमदअली खान (तिघे रा. इस्लामनगर, ता. सादाबाद, जि. हाथरस, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस 9 मे रोजी सायंकाळी नागापूर येथील आठवडे बाजारात पेट्रोलिंग करीत सह्याद्री चौकात एक व्यक्ती विविध नामांकित कंपन्यांच्या शॅम्पूच्या बाटल्यांची अत्यंत स्वस्त दरात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

Ahilyanagar Fake Shampoo
Ashok Kharat: समता पतसंस्था घोटाळा: 60 कोटी प्रकरणात 6 महिलांच्या खात्यांची एसआयटीकडून फेरतपासणी

पोलिस पथकाने सापळा रचून शानमोहम्मद पप्पूखान आलबी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या काळ्या धंद्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून केमिकल मिश्रणाने बनवलेल्या बनावट शॅम्पू जप्त केला. त्या बाटल्यांवर क्लिनिक प्लस, डव्ह, हेड अँड शोल्डर्स अशा कंपन्यांची नावे टाकली आहेत. त्यासह बाटल्यांच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, घातक केमिकल व पावडर असा 1 लाख 18 हजार 186 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Ahilyanagar Fake Shampoo
Karjat Political Crisis: कर्जत नगरपंचायतीतील अविश्वास ठरावाला स्थगिती; उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

याबाबत हिंदुस्थान युनिलिव्हर लि.चे फिल्ड ऑफिसर किरीट गुणवंतराय पंड्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी, सहायक फौजदार राकेश खेडकर, पोलिस अंमलदार राजू सुद्रीक, शैलेश रोहोकले, सचिन आडबल, किशोर जाधव, दीपक फुंदे, नवनाथ दहिफळे, राहुल गुंडू यांच्या पथकाने केली.

Ahilyanagar Fake Shampoo
Heatwave Nagar 41°C: नगरमध्ये उष्मालाटेचा यलो अलर्ट; पारा 41 अंशांवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बनावट ट्रेडमार्क व लेबल वारून बाजारात विक्री

साथीदार रब्बानी अब्बास व फैजान खान यांच्यासह मिळून हा बनावट शॅम्पूचा कारखाना थाटल्याचे सांगितले. वरील आरोपी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या क्लिनिक प्लस, डव्ह, हेड अँड शोल्डर्स व पॅन्टीन या नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायचे. त्यामध्ये अज्ञात धोकादायक केमिकलचे मिश्रण भरून, ग्राहकांची दिशाभूल करून अस्सल शॅम्पू म्हणून विक्री करीत असत. हा शॅम्पू मानवी आरोग्यास आणि केसांसाठी अत्यंत अपायकारक आहे हे माहीत असतानाही, बनावट ट्रेडमार्क आणि लेबल वापरून ते बाजारपेठेत विकत होते, असे चौकशीत समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news