Duplicate Voters: पालिकांच्या मतदारयादीत तब्बल 6,518 दुबार नावे उघड
नगर : जिल्ह्यातील पालिकांसाठी 4 लाख 51 हजार 262 मतदार असून, मतदारयादीची पडताळणी केली असता 6 हजार 518 मतदारांची नावे दुबार किंवा अधिक ठिकाणी आढळून आली आहेत. या मतदारांकडून आता केंद्रस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी हमीपत्र भरुन घेणार आहेत.(Latest Ahilyanagar News)
मतदारयाद्या बिनचूक करण्यासाठी दुबार आणि तिबार मतदार शोधण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाच्या निदर्शनानुसार निवडणूक यंत्रणेने नगरपालिका, नगरपंचायतींची संभाव्य दुबार मतदारांची यादी तयार केली. दुबार मतदारांच्या नावापुढे स्टार चिन्ह असणार आहे. निवडणुकीपूर्वी बीएलओ दुबार मतदारांकडून हमीपत्र भरुन घेणार आहेत.
त्यासाठी बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. त्यांना कोणत्याही एका मतदार संघातील, एका प्रभागातील एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड दुबार मतदाराने करायची आहे. त्यासाठी अर्ज भरून घेतला जाणार आहे. मतदाराने नकार दिल्यास मतदानाच्या वेळेस हमीपत्र भरून दिल्याशिवाय संबंधित मतदाराला मतदान करता येणार नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.
पालिकानिहाय दुबार मतदार
श्रीरामपूर : 1635, संगमनेर : 1303, कोपरगाव : 817, राहुरी :258, देवळाली प्रवरा : 175, राहाता : 131, पाथर्डी : 260, श्रीगोंदा : 280, शेवगाव : 377, जामखेड : 557, शिर्डी : 563 नेवासा : 162.

