

श्रीरामपूर: शहरातील सेंट लुक हॉस्पीटल जवळ बीएचएमएस शिक्षण घेतलेल्या 28 वर्षीय डॉक्टर तरूणाला पैशांची मागणी करत मारहाण करत त्याचे 4 दात पाडून त्याच्याकडील रोकड व मोबाईल लुटून नेला.
अहिल्यानगर येथील विवेकानंद मेडिकल इन्स्टिटयुट ऑफ इलेक्ट्रोपॅथी अँड रिसर्च सेंटर येथे बीएचएमएसच्या तिसर्या वर्षात शिक्षण घेत असलेले प्रसाद जालिंदर पर्हे हे आपले मित्र प्रमोद त्रिभुवन, प्रतीक नरवडे यासमवेत मोटारसायकल घेवून नेवासा रोडवरील मित्र सुनील मोरे यांच्या बांबूच्या दुकानात गेले होते. सुनील हे बाहेरगावी असलेले फोनवरून कळाले. त्यानंतर पर्हे हे तेथून निघून जात असताना सुनील यांच्या दुकानात बसलेले मुलं त्यांच्याजवळ आले आणि शिवीगाळ करत पैशांची मागणी केली, तेव्हा पर्हे यांनी पैसे नसल्याचे सांगताच दुकानातील बांबूने त्यांना व त्यांच्या मित्राला मारायला सुरुवात केली.
तेव्हा ते तेथून पळत सेंट लुक हॉस्पीटलजवळ गेले, त्यानंतर मोटारसायकलवरून चौघेजण तेथे आले आणि त्यांनी पैशांची मागणी करत प्रसाद पर्हे यांना लाकडी बांबू, फायटर तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी अज्ञात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नीतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत.