

अकोले: समाजातून बालविवाह आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार संपवण्यासाठी कठोर कायदे असतानाही, अशा घटना अजूनही घडत अकोले तालुक्यात १८ महिन्यात तब्बल ३३ अल्पवयीन पिडितेवर बलात्कार व विनयभंगाचा घटना घडल्याने ३४ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
दरम्यान आदिवासी भागातील पेडशेत येथील १४ वर्षाच्या अल्पवयीन पिडितेवर २७ वर्षाच्या नराधामाने बलात्कार केल्याने पिडीता गर्भवती असल्याचा घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Ahilyanagar News)
याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, दोन ते अडीच महिन्यापूर्वी १४ वर्षाची अल्पवयीन पीडित पेनशेत गावात साखर आणण्यासाठी वाटेने जात असताना तिला रोडवर आरोपी विठ्ठल मारुती मुठे याने थांबून तिचा बळजबरीने हात पकडून तिला पेडशेत परिसरात काळवाड येथील झाडेत घेऊन जाऊन दोन वेळेस बळजबरीने व जबरदस्तीने बलात्कार केलाआणि पिढीतेला धमकी दिली, तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, त्यामुळे अल्पवयीन पिडीतेन झालेली घटना घरी सांगितली नाही.
तसेच पिडीता नुकतीच शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली असता ती गर्भवती असल्याचे समजल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजूर पोलीस स्टेशनला पत्र व्यवहार केल्याने राजुर पोलीसात आरोपी विठ्ठल मारुती मुठे वय २७ रा.पेंडशत याच्या विरोधात भा न्या.स ६४(२), एम १२७(२),३५१(२) व पोक्सो ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी विठ्ठल मारुती मुठे या नराधमाला अटक करण्यात आले आहे. तर पुढील तपास स.पो.नि.दिपक सरोदे करत आहेत.
ही बाब समाजात लैंगिक अत्याचार किंवा किशोरवयीन मुलींचे शारीरिक शोषण याबाबत गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. अल्पवयीन असताना गर्भधारणा होणे, हे केवळ सामाजिक नव्हे, तर वैद्यकीय दृष्टिकोनातूनही धोकादायक मानले जाते. शरीराची पूर्ण वाढ न झालेल्या मुलींसाठी गर्भधारणा आणि प्रसूती ही जीवावर बेतणारी ठरू शकते. अशावेळी प्रसूतीदरम्यान गुंतागुंत, रक्तक्षय, प्रसूतीपश्चात संसर्ग तसेच नवजात बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
'पोक्सो' अंतर्गत गुन्हा
१८ वर्षांखालील गर्भवती असल्यास अशा सर्व प्रकरणांवर 'पोक्सो' कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो. १८ वर्षांखालील मुलींच्या प्रसूतीला कायद्यानुसार अल्पवयीन गर्भधारणा आणि प्रसूती समजतात. तसेच १८ वर्षाखाली मुली किंवा मुलांवर लैंगिक अत्याचारप्रकरणीदेखील 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो.
तर राजूर पोलिस स्टेशन हद्दीत २०२४- २५ या कालावधीत ७ गुन्हे तर अकोले पोलिस स्टेशन हद्दीत २०२४ - २५ या कालावधीत २६ गुन्हे अशाप्रकारे १८ महिन्यांत पोक्सोअंतर्गत ३३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.तर खासगी रुग्णालयांमधून अशा अल्पवयीन मातांच्या गर्भवती बाबत नेमकी आकडेवारी उपलब्ध होत नाही. खासगी रुग्णालयांमध्येही अशा घटना घडत असण्याची शक्यता असल्याने, त्यांची आकडेवारी मिळवणे आणि त्यावरही योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.
विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी समाज प्रबोधन अकोले व राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांमध्ये नोंद झालेल्या पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची संख्या धक्कादायक आहे. लहान मुलींवर होणारे हे अत्याचार समाज मनातील विकृती दर्शवणारे आहेत.
'पोक्सो' कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये तत्काळ कारवाई करणे महत्त्वाचे असते, जेणेकरून पीडितांना न्याय मिळेल आणि समाजात योग्य संदेश जाईल. बालविवाह आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात आमची कारवाई सुरू राहील.तर अल्पवयीन मुलींशी संबंधित गुन्हे अत्यंत गंभीरपणे हाताळले जातात.तसेच वयात आलेल्या मुला - मुलींकडे आई- वडिलांनी लक्ष देणे गरजेचे असून आपली मुले मोबाईलचा वापर कसा करत असतात.आणि शिक्षणाबरोबर मुलांच्या वागणुक व हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
स.पो.नि.दीपक सरोदे, राजूर.
चिमुकल्यांचे प्रबोधन, स्वरक्षणाची जाणीव, शाळा महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज, विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी समाज प्रबोधन या सगळ्यांची नितांत गरज आहे. निश्चित एखाद्या घटनेमधल्या विकृत अपराधीला लवकरात-लवकर कडक शिक्षा मिळणे हे दिशादर्शक ठरेल. जनसामान्यांमध्ये कायद्याचा व पोलिसांचा धाक कमी झालाय हे दिसून येते. एक बाब ही पण महत्त्वाची ज्या घटना पोलिसांपर्यंत पोहोचल्या त्यांची संख्या पाहता ज्या घटना अजूनही उघडकीस आल्या नाहीत त्यांची संख्या मोठी असणार याची भीती वाटते ! त्या लेकरांना संरक्षण व न्याय आपण कसे देणार आहोत.
उत्कर्षाताई रूपवते,माजी सदस्या, महिला आयोग, महाराष्ट्र राज्य