Online Trading Scam: ट्रेडिंग कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

या कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Trading Scam
Trading ScamPudhari
Published on
Updated on

टाकळीभान: श्रीरामपूर तालुुक्यातील टाकळीभानसह परिसरातील अनेक तरुणांना जादा परताव्याचे आमिष दाखवून, एका ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीने कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाईन गुंतवणुकीद्वारे दररोज डॉलरच्या स्वरूपात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला, अशी तक्रार बापूसाहेब शिंदे यांनी अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाक्‌‍चौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Trading Scam
Lohkara bridge flood damage: अतिवृष्टीत वाहून गेलेला पूल ‌‘जैसे थे‌’!

शिंदे यांचा मुलगा शेख शिंदे (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) याला या कंपनीने फसवले आहे. कंपनीकडून ‌‘बोन चॅट‌’ माध्यमातून विविध संदेश व चॅटिंग करण्यात येत होते.ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले.

त्यानंतर झूम ॲपद्वारे वेळोवेळी बैठका पार पडल्या. यामध्ये वैजापूर व नागपूर येथील काही व्यक्तींनी स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी व ट्रेडिंग सल्लागार सादर करून, विश्वास संपादन केला. त्यांच्या सांगण्यावरून शेखर शिंदे यांनी, विविध तारखांना ऑनलाईन पद्धतीने पैसे गुंतविले. सुरुवातीला नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले, मात्र नंतर रक्कम परत मिळणे बंद झाले. संबंधित व्यक्तींनी संपर्क टाळण्यास सुरुवात केल्यानंतर, हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आले.

Trading Scam
Municipal Recruitment: महापालिका पदभरती रेंगाळली; टीसीएसकडे पत्रव्यवहार सुरू, अभियंत्यासह 45 पदे भरणार

संगनमताने खोटी माहिती, खोटे आश्वासन व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून अनेकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उककले, असा आरोप शिंदे यांनी निवेदनात केला आहे. टाकळीभान पंचक्रोशीतील सुमारे 1500 ते 1600 लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

सुरुवातीला सरासरी 30 हजार रुपयांची गुंतवणूक स्वीकारली होती, मात्र अनेकांनी 90 हजार, 1 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख व त्यापेक्षा अधिक रक्कम गुंतविल्याचे वास्तव समोर आले आहे. यासंपूर्ण प्रकरणात किमान 15 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात व्यवहारांचे स्क्रीनशॉट, बँक व्यवहारांचे तपशील, मोबाईल क्रमांक व अन्य पुरावे उपलब्ध आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news