Chanda Fake Foreign Liquor Seized: चांद्यात बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; ४,७४६ बाटल्यांसह ११.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; रसायन, बनावट लेबले, पॅकिंग साहित्य आणि वाहन जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Chanda Fake Foreign Liquor
Chanda Fake Foreign LiquorPudhari
Published on
Updated on

सोनई/चांदा: बनावट दारू तयार करून वेगवेगळ्या कंपन्यांचे बनावट लेबल चिकटवून विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे चांदा येथे स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात उघड झाले. पोलिसांनी ११ लाख ७२ हजार १३० रुपयांच्या मुद्देमालासह बनावट दारूच्या ४७४६ बाटल्या जप्त केल्या आहेत.

Chanda Fake Foreign Liquor
Ahilyanagar Gram Panchayat Funds: नगरच्या ग्रामपंचायतींच्या तिजोरीत 330 कोटींचा निधी अडकला; अधिकारांअभावी विकासकामे ठप्प

संदीप शिवाजी गायकवाड व राजू जावळे हे एका साथीदारासह गायकवाडच्या घराजवळ शेडमध्ये मानवी आरोग्यास हानिकारक दारूचे रसायन तयार करून त्यातून बनावट विदेशी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Chanda Fake Foreign Liquor
Pathardi Illegal Gutkha Raid: पाथर्डीत मावा-गुटखा माफियांवर एलसीबीचा धडक छापा; तीन ठिकाणी कारवाई, चार जण अटकेत

ही दारू वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून सील करून मूळ कंपनीची असल्याचे भासवून आसपासच्या गावांतील हॉटेलमध्ये विकली जात असल्याची माहितीही समजली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता ४७४६ बाटल्यांसह बूच, नरसाळे, कटर, चिकट टेप, रसायन व चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख ७२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Chanda Fake Foreign Liquor
Karanji New Bridge: करंजीतील व्यावसायिकांचा आदर्श; स्वखर्चातून १३ लाखांचा पूल उभारून वाहतुकीला दिलासा

पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप दरवडे, बाळासाहेब नागरगोजे, विजय पवार, अरुण गांगुर्डे, अशोक लिपणे, भगवान धुळे, भगवान सानप यांना चांदा येथे पथकाने ही कारवाई केली. भगवान सानप यांच्या फिर्यादीवरून संदीप शिवाजी गायकवाड, राजू जावळे (रा. चांदा) व अज्ञात इसमावर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news