Pathardi Crime: धक्कादायक! 'ती' आंघोळ करत असताना 'तो' पत्र्यावरून पाहत होता; गुन्हा दाखल

या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ahilyanagar News
धक्कादायक! 'ती' आंघोळ करत असताना 'तो' पत्र्यावरून पाहत होता; गुन्हा दाखल (File Photo)
Published on
Updated on

पाथर्डी तालुका: तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 17 वर्षीय तरुणीला शेजारी राहणार्‍या 18 वर्षीय तरुणाकडून गेल्या काही महिन्यांपासून पाठलाग, छेडछाड आणि धमकी देण्याच्या घटना घडल्या. शनिवारी (ता. 7) सकाळी हा तरुण तरुणीच्या घराच्या बाथरूमजवळील किचनच्या पत्र्यावर चढून डोकावताना आढळला. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. 7) सकाळी 8 वा. अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना तरुण किचनच्या पत्र्यावरून डोकावून पाहत होता. ज्यामुळे तिला व तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. जानेवारी 2025पासून हा तरुण तरुणीला स्कुटीवरून कॉलेजला जाताना रस्त्यात अडवून बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. (Latest Ahilyanagar News)

Ahilyanagar News
Pathardi News: पाथर्डीत रस्त्यावरून वाहतेय गटारगंगा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Pathardi News: पाथर्डीत रस्त्यावरून वाहतेय गटारगंगा; नागरिकांचे आरोग्य धोक्यातफेब्रुवारीत बारावीच्या परीक्षेदरम्यान हिंदीच्या पेपरला जाताना त्याने तरुणीचा हात पकडून लज्जास्पद वक्तव्य केले आणि तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. भीतीपोटी तरुणीने घरच्यांना याबाबत काही सांगितले नाही.

शनिवारी सकाळी 8च्या सुमारास तरुणी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना हा तरुण किचनच्या पत्र्यावर चढून डोकावत होता. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तिची आई धावत आली आणि तिनेसुद्धा हा प्रकार पाहिला. घरच्यांनी आणि शेजार्‍यांनी तरुणाला पकडले. मात्र, संतप्त जमावाने त्याला मारहाण केली.

Ahilyanagar News
Jamkhed: साथ रोगाने जामखेडमधील रुग्णालये हाऊसफुल्ल; अस्वच्छतेमुळे मिळेतय अनेक आजारांना निमंत्रण

यानंतर तरुणीने कुटुंबीयांसह पाथर्डी पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध छेडछाड, धमकी आणि लज्जास्पद वर्तनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news