

नगर : सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री गावामधील हॉटेल न्यू प्रशांत येथे एका महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जेसीबीच्या साह्याने शेतात पुरून टाकण्यात आला होता. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये आरोपींची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात येते. (Ahilyanagar news Update)
फातिमा उर्फ आसमा शोयबउल्ला शेख (वय 25 सध्या रा. हॉटेल न्यू प्रशांत बनपिंप्री,ता. श्रीगोंदा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बनपिंप्री येथील टोलनाक्या शेजारील हॉटेल न्यू प्रशांत येथे ही घटना घडली. पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर यांच्या फिर्यादीवरून कल्याण राजेंद्र पठारे ( वय 47 रा. बनपिंप्री) व अज्ञात साथीदारांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातील कल्याण पठारे यास अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
कल्याण पठारे व अज्ञात साथीदारांनी अज्ञात कारणासाठी, कशाचे तरी साहाय्याने जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्कॉर्पिओ कार (एम.एच.16 एक.टी. 6979) मधून मृतदेह घेऊन जाऊन हातवळण गावच्या शिवारात आरोपीच्या शेतात गट नंबर 111 मध्ये खड्डा खोदून पुरून टाकला होता.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी कल्याण पठारे यास ताब्यात घेतले होते. त्यांचे रिपोर्ट प्रमाणे तहसीलदार यांच्या समक्ष मृतदेह उकरण्यात आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अवस्थेत होता. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शिवविच्छेदन अहवालानंतर महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. श्रीगोंदा पोलिसांच्या तपासात आरोपींची संख्या वाढणार असल्याचे समजते.
आरोपी कल्याण पठारे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आले होते. आरोपीकडे चौकशी करताना ’लाख’मोलाच्या गोष्टी घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. एलसीबी पथकाने केलेल्या तपासानंतर सदर गुन्ह्याची नोंद श्रीगोंदा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
खून केल्यानंतर मृतदेह पुरवण्यासाठी जेसीबीचा वापर केल्याची ही चर्चा आहे. जी गाडी मृतदेह वाहतुकीसाठी वापरण्यात आली त्या गाडीचे मालक, जेसीबी मालक तसेच घोगरगाव येथील एका तरुणाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये हॉटेल मालकावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ज्या हॉटेलवर महिलेचा निर्दयी खून झाला. त्या हॉटेलला परमिट रूमचा परवाना असल्याची माहिती आहे. अशा ठिकाणीच वेश्याव्यवसाय सुरू असल्याने सदर हॉटेलचा परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच खून प्रकरणी मालकावर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी पूर्ण न केल्याने करत माका (ता. नेवासा ) येथे विवाहितेचा गळा आवळून खुन करण्यात आला.
विवाहितेचे वडील गणेश मच्छिंट्र एडके (रा. मुथलवाडी,ता.पैठण) यांनी फिर्याद दिली आहे. पूजाचा (वय 22) विवाह चार वर्षांपूर्वी माका येथील अशोक अर्जुन गोरे याच्याशी झाला होता. पहिले काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केला. अशातच त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर पुन्हा ती गरोदर राहिली. तिचा छळ मात्र थांबत नव्हता. 15 मे रोजी तिच्यावर रागाच्या भरात लैंगिक अत्याचार करत गळा आवळून तिला ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी माका शिवारात पाटाच्या पाण्यात मृतदेह टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.