Bhenda solar energy project: भेंड्यातील सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून ऑनलाईन उद्घाटन

राज्यातील पहिला 20 मेगावॅट सौर प्रकल्प नेवासा तालुक्यात; 12 गावांना अखंडित वीजपुरवठा
Bhenda solar energy project
भेंड्यातील सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून ऑनलाईन उद्घाटनPudhari
Published on
Updated on

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथे राज्यातील पहिल्या 20 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच झाले.

याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे,अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार, कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे, उपकार्यकारी अभियंता राहूल बडवे आदी उपस्थित होते.(Latest Ahilyanagar News)

हा राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या नेवासा येथून सुरू करण्यात आला असून, शेतीसह घरगुती आणि व्यावसायिकांना 24 तास वीजपुरवठा होणार आहे. या प्रकल्पातून तालुक्यातील 12 गावांना नवी झळाळी मिळणार असल्याची माहिती आमदार लंघे यांनी दिली.

या प्रकल्पातून तालुक्यातील म्हसले येथे 10 मेगावॅट, तर रांजणगाव व नजिकचिंचोली येथे प्रत्येकी 5 मेगावॅट असे तीन स्वतंत्र सोलर वीजनिर्मिती संच बसविण्यात आले आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा उपयोग दिवसा शेतीसाठी कृषिपंपांना वीजपुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसभर निर्माण होणारी स्वस्त वीज 12.5 मेगावॅट क्षमतेच्या बॅटऱ्यांमध्ये साठविली जाणार आहे. रात्रीच्या वेळी हीच स्वस्त वीज वापरून तालुक्यातील भेंडा, सौंदाळा, म्हसले,नजिक चिंचोली, रांजणगाव, तरवडी, भानसहिवरा, कारेगाव,खुणेगाव, गेवराई, गोंडेगाव, पिचडगाव आदी 12 गावांना अखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे.

Bhenda solar energy project
Karjat pothole protest: खड्ड्यांमध्ये झाडे लावून ‌‘राष्ट्रवादी‌’ची गांधीगिरी

तालुक्यातील 7 हजार 30 कृषिपंपाना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार असून, 4600 घरगुती आणि वाणिज्य, तसेच औद्योगिक ग्राहकांना बॅटरीमध्ये साठवलेली हीच वीज या सौरउर्जा प्रकल्पातून वितरित केली जाणार असल्याची माहीती यावेळी आमदार लंघे यांनी दिली.

या बॅटरी बॅकअपसह आधुनिक सौरऊर्जा प्रणाली प्रकल्पामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरून 20 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनेल या प्रल्कपामध्ये बसविलेले आहे. या राज्यातील पहिला यशस्वी सौरउर्जा प्रकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करुन लवकरच सुरू केला जाणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

Bhenda solar energy project
Shevgaon Police Officer Court Notice: शेवगावच्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयाची नोटीस; शेअर मार्केट फसवणूक प्रकरण

सौंदाळा (ता.नेवासा) येथील राज्यातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. हा प्रकल्प नेवाशातून सुुरू झाल्यामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचा सार्थ अभिमान आहे.

आमदार विठ्ठलराव लंघे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news