Shankarrao Gadakh: थोरात-विखे एकत्र आल्याने शेतकऱ्यांचा फायदा; शंकरराव गडाखांचे मत

यशवंतराव गडाखांनी दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय घडवल्याचे सांगितले; दुष्काळात पाण्यासाठी संघर्षाचा इशाराही दिला
Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhPudhari
Published on: 
Updated on: 

चांदा: जिल्हा बँकेत बाळासाहेब थोरात व डॉ. सुजय विखे पाटील एकत्र येतील असे कोणालाच वाटले नव्हते; पण ती किमया ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केली. थोरात-विखे एकीने सहकारातील संघर्ष टळल्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल असे मत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.

दुष्काळात पाणी संघर्ष अटळ असल्याचे सांगून पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही गडाख यांनी दिली. याद्वारे शिवसेनेच्या (उबाठा) नेत्याने काँग्रेस आणि भाजपचे नेते एकत्र आल्याचा आनंद व्यक्त केल्याची चर्चा होत आहे.

Shankarrao Gadakh
Ahilyanagar Teachers Protest: शिक्षकांचे आंदोलन, शिक्षणाधिकाऱ्यांची रजा; अहिल्यानगरच्या शिक्षण विभागात नेमके चाललंय काय?

चांदा येथे जिल्हा बँकेचे संचालक कारभारी जावळे व गडाख मित्रमंडळ आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात गडाख बोलत होते. गडाख म्हणाले, जिल्ह्यातील सहकार टिकवण्यासाठी विखे-थोरात एकत्र येण्याने अनेकांच्या अडचणी वाढल्या असल्या, तरी शेतकऱ्यांचा मात्र फायदा होणार आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे सहकारातील योगदान सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळेच सहकारातील नेते मंडळी निवडणुकीअगोदरच त्यांना भेटायला येत होती. नेत्यांमध्ये समन्वय साधण्याची विनंती ते करत होते. बिनविरोधाचे आवाहन करताच सहकारातील नेत्यांनी प्रतिसाद दिला. त्यातूनच विखे-थोरात एकत्र आले. त्याचा सर्वसामान्यांना आनंद झाला, पण अनेकांची अडचण झाली.

आजच्यासारख्या दुष्काळाची परिस्थिती यापूर्वी कधी पाहिली नाही. एकाच आवर्तनासाठी मुळा धरणातून आठ टीएमसी पाणी खर्च झाले. आता उर्वरित पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी योग्य नियोजन केल्यास मुळा धरणातून आणखी दोन आवर्तने होतील. मात्र दुष्काळी स्थितीत लोकप्रतिनिधी काय करतात? असा सवाल करत तालुक्यात काय चाललेय हे कळेना झाले.

Shankarrao Gadakh
Rohit Pawar Drought Relief: कर्जत-जामखेडमध्ये दुष्काळ गंभीर; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख द्या: रोहित पवार

दुष्काळाच्या तीव्रतेवर कोणीच बोलत नाही, अशी टीका गडाख यांनी आ. विठ्ठलराव लंघे यांचा नामोल्लेख टाळून केली. आता पाण्यासाठी संघर्ष अटळ असून आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. संघर्ष करण्याची तयारी असल्याचे गडाख म्हणाले.

माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा कारखान्याचे माजी अध्यक्ष नानासाहेब तुवर, जिल्हा परिषद माजी सदस्य विजयाताई अंबाडे, डॉ. विनोद गुंदेचा, राजेंद्र टेमक, एन.टी. शिंदे, एकनाथ भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले. जेष्ठ नेते विश्वासराव गडाख, माजी सभापती रावसाहेब कांगुणे, सभापती नंदकुमार पाटील, भगवानराव गंगावणे, मुळाचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, व्हा चेअरमन बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. प्रा. रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब जावळे यांनी आभार मानले.

जिल्हा बँकेची उमेदवारी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम आजवर गडाख कुटुंबाने केले. आता गडाखांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी काम करू.

- कारभारी जावळे, संचालक, जिल्हा बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.