

कर्जत: बाभळगाव खालसा गावात शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रोहित्राच्या मागणीची दखल घेत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर यांच्या माध्यमातून तीन ठिकाणी सिंगल फेज रोहित्रे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी उदमले वस्ती व झोडगे वस्ती येथे दोन सिंगल फेज रोहित्रांचे लोकार्पण पार पडले. यामुळे शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा विजेचा प्रश्न सुटला आहे.
लोकार्पणप्रसंगी सरपंच सुभाष पाबळे, डॉ. दिगंबर पुराणे, माजी सरपंच पंडित पुराणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश आण्णा तोरडमल, आप्पासाहेब कांबळे, सुधीर झोडगे, पै. केशव पाबळे, पोपट धनवडे, प्रा. भास्कर कदम, ज्ञानदेव तोरडमल, बाळासाहेब गुंड, बापूराव काळे, गणेश शिकारे, सचिन खेडकर, बाबासाहेब कदम, मोतीलाल गुंड, बापू शिंदे, भाऊ जवणे, बंडू पाबळे, आकाश तोरडमल, सतीश पाबळे, सतीश तोरडमल आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी रोहित्रांसाठी यापूर्वी अशोकराव खेडकर यांच्याकडे मागणी केली होती. त्या मागणीची तत्काळ पूर्तता करत त्यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून तीनही रोहित्र मंजूर करून घेतले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजपुरवठा अधिक सुरळीत होणार असून, पिकांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
या वेळी खेडकर म्हणाले की, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सहकार्यामुळे केवळ बाभळगाव खालसा नव्हे, तर संपूर्ण चापडगाव गटामध्ये अनेक ठिकाणी सिंगल फेज रोहित्र मंजूर करून घेणे शक्य झाले. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या कार्याबद्दल बाभळगाव खालसा, तसेच परिसरातील शेतकरी वर्गातून खेडकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरात विजेची समस्या सुटली आहे, असे भाजप तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी सांगितले.