Amul Kulfi Adulteration: अमुल कुल्फीत भेसळ; अहिल्यानगरात अन्न प्रशासनाची मोठी कारवाई

1856 पॅकेट्स जप्त; वनस्पती तेल वापर प्रकरणी कंपनीकडून खुलासा मागवला
Amul Kulfi Adulteration
Amul Kulfi AdulterationPudhari
Published on
Updated on

नगर: गुजरात को- ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (अमुल) या नामांकित कंपनीमार्फत उत्पादित होऊन पुरवठा होत असलेल्या कुल्फीमध्ये वनस्पती तेल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने शहरातील काही दुकानामध्ये छापे घालून 55 हजार 680 रुपयांची भेसळयुक्त कुल्फीची 1856 पॅकेट्स जप्त केली. ही कारवाई 13 एप्रिल रोजी करण्यात आली.

Amul Kulfi Adulteration
Pathardi Teacher Job Fraud: पाथर्डीत शिक्षक नोकरीच्या आमिषाने 13.5 लाखांची फसवणूक

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (अमुल) या नामांकित कंपनीमार्फत उत्पादित होऊन पुरवठा होत असलेल्या अनेक प्रकारच्या कुल्फीमध्ये सर्रास वनस्पती तेल, फॅटचा वापर होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आलेे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 13 एप्रिल रोजी अहिल्यानागर शहरातील अमुल ब्रँड कुल्फीचे वितरण करणाऱ्या दुकानांवर छापे घालून तपासणी केली.

Amul Kulfi Adulteration
Shrisant Nagebaba Multistate Election: श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट निवडणूक जाहीर; कडूभाऊ काळेंना धक्का

त्यानुसार अमुल ब्रँड कुल्फीचे नमुने घेऊन 55 हजार 680 रुपयांचे भेसळयुक्त कुल्फीचे 1856 पॅकेट्सचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, कि. ध. जगदाळे यांनी सहायक आयुक्त ग. वि. जगताप यांच्या पथकाने केली. अहिल्यानगार जिल्ह्यातील अमुल ब्रँड या कंपनीचे अन्य अधिकृत वितरक यांच्याकडे सुद्धा याबाबत तपासणी करून कार्यवाही घेण्यात येईल, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news