Tractor Fraud: शेतकऱ्यांची नावे वापरून ट्रक्टर फसवणूक; अकोल्यात दोन जणांना अटक!

राजूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ९ ट्रक्टर आणि २ मोटारसायकलीसह ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Tractor Fraud
Tractor FraudPudhari
Published on
Updated on

अकोले: आदिवासी भागातील शेतकऱ्यांची नावे ट्रक्टर घेवुन, त्यांची फसवणुक करुन ट्रक्टर पळवणाऱ्या टोळीतील दोन आरोपीना अटक करण्यात स.पो.नि.दीपक सरोदे यांना यश आले आहे. दरम्यान भालचंद्र अशोक साळवी, रा. वनकुटे, ता. पारनेर, अभिजित सुनिल भांडवलकर, वय ३२ वर्ष, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर या दोघाकडुन ९ ट्रक्टर सह २ मोटार सायकल जप्त करून सुमारे ७१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने राजूर पोलिसांच्या कामगिरीचे आदिवासी भागातुन कौतुक होत आहे. (Latest Ahilyanagar News)

Tractor Fraud
Kopargaon Municipal Election 2025: कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हे सामना? नगराध्यक्षपदासाठी ओबीसीमध्ये चुरस

प्रस्तुत प्रकरणी हकीगत अशी की, यातील फिर्यादी हिरामण चंदर खाडे वय ५० वर्षे धंदा शेती रा. बारी ता. अकोले यांना आरोपी भालचंद्र अशोक साळवी, रा.वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना तुम्हांला ट्रक्टर घेण्यास मदत करतो असे सांगुन नवीन ट्रक्टरचे डाऊन पेमेंट १ लाख रुपये मी भरतो तसेच सदरचे ट्रक्टर तुमचे नावावर घेवुन देतो, ट्रक्टर आल्यनंतर तुम्हांला वाटल्यास ट्रक्टर माझेकडे कामाला लावा मी तुम्हाला त्या मोबदल्यात. ८० हजार रुपये देतो तसेच पुढचा ६ महिन्याचा हफ्ता देखील भरतो. आणि सहा महिन्यासाठी ट्रक्टर वापरण्याचे मोबदल्यात तुला ३० हजार रुपये महिना देतो. असे अमिष देवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडे त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, त्यांचे नावावर असलेल्ल्या शेतीचे उतारे, रेशनकार्ड असे घेवुन त्यांना L&T कंपनीचे फायनान्स कंपनीचे लोन करुन दि.४ जुन२०२५ रोजी ट्रक्टर श्री. महाकाली शोरुम, श्रीरामपुर येथुन घेवुन दिले होते.

Tractor Fraud
Ahilyanagar Municipal Elections 2025: जिल्ह्यातील १२ पालिका निवडणुकांचा वाजला बिगूल

व सदरचे ट्रक्टर दि. ६ जून २०२५ रोजी आरोपी यांनी फिर्यादीचे फसवणुक करुन स्वतकडे घेवुन गेले व ठरल्याप्रमाणे ८० हजार रुपये फिर्यादीस दिले नाहीत तसेच फिर्यादीचे फोन उचलने बंद केले त्यावेळी फिर्यादी यांना फसवणुक झाल्याचे समजल्याने त्यांनी राजुर पोलीस स्टेशन येथे दि.२९ आँक्टोबर रोजी गु.र.न. ४०१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१६ (२), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुरचे सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनिय माहिती, सदर आरोपी हा महाराष्ट्र राज्य, उत्तर प्रदेश, बिहार राज्य येथे नेहमी जा ये करत असतो. त्यावर पाळत ठेवली असता तो दि.४ रोजी अहिल्यानगर महाराष्ट्र येथे आल्याचे समजताच आरोपी भालचंद्र अशोक साळवी, रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर आणि अभिजित सुनिल भांडवलकर, वय ३२ वर्ष, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

Tractor Fraud
Balasaheb Thorat: निळवंडे विसरावे म्हणून भोजापूरचा गाजावाजा – बाळासाहेब थोरातांचा विखेंवर अप्रत्यक्ष टोला

व सदरचे ट्रक्टर हे आम्ही करण रजपुत, सिल्लोड, जि. संभाजीनगर यांना ४ लाख रुपये किंमतीला विकला असे सांगीतले. तसेच त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे असे सांगुन ९ ट्रक्टर व २ मोटार सायकल त्यांचे फायदयाकरीता विकली आहेत. सदर ९ ट्रक्टर पैकी १ शिर्डी, ३ अहिल्यागनर, २ श्रीगोंदा, २ नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे, १ सिन्नर, जि. नाशिक तसेच मोटार सायकल पैकी १ श्रीगोंदा व १ नारायणगाव या ठिकाणी वेगवेगळे पथके नेमणूक करून ७१लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन या गुन्हयात भालचंद्र अशोक साळवी, रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर आणि अभिजित सुनिल भांडवलकर, वय ३२ वर्ष, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर यांना अटक करण्यात आलेले असुन त्यांचे इतर साथीदार व साक्षीदार यांचेकडे चौकशी चालु आहे. या गुन्हयाचा तपास राजुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. दिपक सरोदे करत आहेत.

Tractor Fraud
Absconding Accused: गंभीर गुन्ह्यातील तीन महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; जामखेड पोलिसांची धडक कारवाई!

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पोहेकॉ सचिन धनाड,,पो.कॉ. अशोक गाढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर कार्यालयातील पोहेकॉ दत्तात्रय मेंगाळ, पोना बापुसाहेब हांडे, पोकॉ राहुल सारबंदे, राजुर पोलीस स्टेशन चे स.पो.नि. दिपक सरोदे, पोहेकॉ नरोडे, पोकॉ रत्नपारखी, पोकॉ परते, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोसई सागर काळे, पोहकॉ संदिप उदावंत तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे, पोकॉ अरुण पवार, पोकॉ मयुर तोडमल असे वेगवेगळया पथक तयार करण्यात येऊन विशेष कामगिरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news