Fake Currency Racket: नगर पोलिसांनी उघड केला बनावट नोटांचा छापखाना; पाच जणांना अटक, एक पसार

वाळूज एमआयडीसीजवळ छपाई सुरू असतानाच टाकला छापा; दोन कोटींच्या नोटांच्या कागदासह 59 लाखांच्या बनावट नोटा जप्त
Fake Currency Racket
नगर पोलिसांनी उघड केला बनावट नोटांचा छापखाना; पाच जणांना अटक, एक पसारPudhari
Published on
Updated on

Ahmednagar fake note factory busted

नगर: छत्रपती संभाजीनगरजवळ वाळूज एमआयडीसी हद्दीतील तिसगाव परिसरात बनावट नोटा तयार करणार्‍या छापखान्यावर नगर पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला. त्यात दोन कोटींच्या बनावट नोटा छापल्या जात होत्या.

त्यासाठी आणलेला कागद छपाईपूर्वीच ताब्यात घेण्यात आला, तर छापून तयार झालेल्या 59 लाखांच्या नोटा चलनात येण्यापूर्वीच हस्तगत करण्यात आल्या. या वेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, एक जण पसार आहे. (Latest Ahilyanagar News)

Fake Currency Racket
Jamkhed News: राज्यकर्त्यांना सर्वसामान्यांचा विसर: आ. पवार

काही दिवसांपूर्वी राहुरी शहरात काही आरोपींकडे बनावट नोटा सापडल्या होत्या. त्यानंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक संजय ठेंगे यांनी सोलापूर जिल्ह्यात पथक पाठवून बनावट नोटांच्या कारखाना उघड केला. तेथून कोट्यवधींचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

हे प्रकरण ताजे असतानाच दि. 27 जुलै 2025 रोजी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी एका काळ्या रंगाच्या आलिशान जीपमधून निखिल शिवाजी गांगर्डे (वय 27, रा. कुंभळी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि सोमनाथ माणिक शिंदे (वय 25, रा. तपोवन रोड, अहिल्यानगर) या दोघांना बनावट नोटांसह ताब्यात घेतले.

या आरोपींच्या कबुली जबाबातून नगरच्या बनावट नोटांच्या रॅकेटचे छत्रपती संभाजीनगर आणि बीड कनेक्शन समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक गिते यांनी पथकासमवेत छत्रपती संभाजीनगर हद्दीतील एमआयडीसी परिसरातीील प्रिंटिंग प्रेसवर छापा टाकला. तेथून 59.50 लाखांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, 2 कोटी 16 लाखांच्या बनावट नोटा तयार करण्याचे कागद, शाई, साहित्य, तसेच 27 लाख 90 हजार 600 रुपयांचे बनावट नोटा तयार करण्याचे मशिन, संगणक साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणात बीड जिल्ह्यातून प्रदीप संजय कापरे (वय 28, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), छत्रपती संभाजीनगरमधून मंगेश पंढरी शिरसाठ (वय 40), विनोद दामोधर अरबट (वय 53), आकाश प्रकाश बनसोडे (वय 27), अनिल सुधाकर पवार (वय 34) यांना ताब्यात घेतले. आणखी एक आरोपी अंबादास रामभाऊ ससाणे (रा. शहरटाकळी, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) हा फरार आहे.

Fake Currency Racket
Rice Farming: अकोल्यात भात आवणीची लगबग! पावसाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांसमोर आव्हाने

कारवाई करणार्‍या पथकात उपनिरीक्षक भरत धुमाळ, सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबासाहेब खेडकर, मंगेश खरमाळे, शरद वांढेकर, खंडू शिंदे, सागर मिसाळ, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग, अदिनाथ शिरसाठ, अन्सार शेख, मोहिनी कर्डक, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांचा समावेश होता.

एका सिगारेटने उघड केला कारखाना

नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत रुईछत्तीशी परिसरात 27 जुलै रोजी सकाळी दोन जण आलिशान जीपमधून आले. तेथील पानटपरीवर जाऊन त्यांनी पाचशे रुपये देत 100 रुपयांचे सिगारेटचे पाकीट घेतले आणि 400 रुपये परत नेले.

दुपारी पुन्हा तेच दोघे 500 रुपयांची नोट घेऊन आले. 100 रुपयांचे सिगारेट पाकीट घेतले आणि उरलेले 400 रुपये परत नेले. मात्र याबाबत पानटपरीचालकाला संशय आला. त्याने नोटा पाहिल्या आणि सहायक पोलिस निरीक्षक गिते यांना माहिती दिली. गिते यांनी सापळा लावून ‘त्या’ दोघांना ताब्यात घेतले. यानंतर पुढे बनावट नोटांचा कारखानाच पोलिसांच्या कारवाईत उघड झाला.

नेवासा, शेवगाव रडारवर?

याबाबत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले, की नेवासा, शेवगाव, छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय आहे. पानटपरी, दारू दुकाने, भाजी दुकानांत अशा नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होतो. बँक अधिकार्‍यांशीही बैठक घेऊ. डिझाईनर, तांत्रिकी आरोपी शोधण्याचा प्रयत्न आहे. बनावट नोटा चलनात आल्या का, याच्या मुळाशी जाणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news