Ahilyanagar Weather Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात येलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा जारी

विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याचे वारे; नागरिक व शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
Yellow Alert
Yellow AlertPudhari
Published on
Updated on

नगर: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 3 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Yellow Alert
Ahilyadevi Holkar Jayanti: अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज: एकनाथ शिंदे

रविवार ते बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार रविवारी (दि.31) काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहिला. तर काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होऊन रिमझिम झाली.

Yellow Alert
Ahilyanagar Pulse Polio Campaign: अहिल्यानगरमध्ये पल्स पोलिओ मोहीम; 28 जूनला 0 ते 5 वर्षांतील सर्व बालकांना डोस

तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये.

Yellow Alert
Shrirampur Police Humanity: श्रीरामपूर पोलिसांचा माणुसकीचा आदर्श; चुकून उतरलेल्या तामिळनाडूच्या विद्यार्थ्याला मदतीचा हात

तसेच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र व लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

Yellow Alert
Ahilyanagar Police Cross Raids: एसपी सुदर्शन यांचा धडाका! अहिल्यानगरमध्ये 990 क्रॉस रेड; 3.15 कोटींचा मुद्देमाल जप्त

पेरणीची घाई नको

हवामानात बदल होण्यास प्रारंभ झाला असून, आगामी आठवड्यात आणखी बदल होईल. वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी खरीप पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news