HPV Vaccination Campaign: अहिल्यानगरमध्ये 14 वर्षांच्या 3915 मुलींना एचपीव्ही लस

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 11 मार्चपासून मोहीम; सात नागरी आरोग्य केंद्रांवर मोफत लसीकरण
HPV Vaccine
HPV VaccinePudhari
Published on
Updated on

नगर: गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने महापालिका कार्यक्षेत्रातील वयाची 14 वर्षे पूर्ण झालेल्या 3915 मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. यासाठी 11 मार्चपासून मोहीम राबविण्यात येणार आहे.

HPV Vaccine
Kanifnath Madhi Yatra: श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराज यात्रा; रंगपंचमीला लाखो भाविकांची गर्दी

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय प्रारंभ झाला असून, राज्यभरातील सर्व जिल्हे, महापालिका व संबंधित आरोग्य संस्थांमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये गार्डासिल लस पात्र लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे.

HPV Vaccine
Ahilyanagar Women Tie and Dye Workshop: महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये ‘टाय अँड डाय’ कार्यशाळा

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करणे हाच एचपीव्ही लसीकरणाचा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 14 वर्षे वयोगटातील मुली (14 वा वाढदिवस साजरा केला, 15 वा वाढदिवस अद्याप झालेला नाही अशा) या एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत.

HPV Vaccine
Ahilyanagar Womens Day Event: महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये 75 कर्तबगार महिलांचा सन्मान

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदलाची बैठक झाली. या बैठकीस डॉ. सतीश राजूरकर (निमा संघटना) यांच्यासह नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

HPV Vaccine
Rahuri Biohappiness Center MPKV: राहुरी कृषी विद्यापीठात देशातील पहिले ‘बायोहॅपीनेस सेंटर’ सुरू

सात आरोग्य केंद्रांवर सुविधा

महापालिकेच्या 7 नागरी आरोग्य केंद्रांवर सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांची शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केली जाणार असून, त्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व 14 वर्षे वयोगटातील पात्र मुलींनी नागरी आरोग्य केंद्रात जाऊन एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news