Ahilyanagar Water Scarcity: अहिल्यानगर तालुक्यात पाणीटंचाईची चाहूल; टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूरसह अनेक गावांमध्ये टंचाईची झळ; प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था सुरू
Water Tanker
Water TankerPudhari
Published on
Updated on

नगर: अकोले, पारनेर, संगमनेरपाठोपाठ अहिल्यानगर तालुक्यात देखील पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या तालुक्यातील ससेवाडी, बहिरवाडी व इमामपूर या तीन गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहेत. सध्या बहिरवाडी व इमामपूर या दोन गावांसाठी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 14 गावे आणि 47 वाड्यांसाठी 12 टँकर धावत आहेत.

Water Tanker
Ahilyanagar Maliwada Gate Demolition: अहिल्यानगरमध्ये माळीवाडा वेस पाडण्यावरून न्यायालयीन लढा

सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यास जानेवारी -फेब्रुवारी महिन्यातच काही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा सुरू होतात. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे संगमनेर, अहिल्यानगर, अकोले, पारनेर आदी तालुक्यांत मार्च - एप्रिल महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होते.

Water Tanker
Ahilyanagar Truck Fire Investigation: कोपरगाव–येसगाव मार्गावर ट्रकला आग; पोलिसांवर गंभीर आरोप

त्यानुसार मार्च महिन्यात पहिल्यांदाच अकोले तालुक्यात टँकर सुरू झाला. त्यानंतर पारनेर तालुक्यात टँकरची मागणी झाली. गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वीच संगमनेर तालुक्यात टंचाई परिस्थिती तीव्र झाली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात ससेवाडी, इमामपूर आणि बहिरवाडी आदी तीन गावांकडून टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल झाले.

Water Tanker
Ashok Kharat: शिर्डी फसवणूक प्रकरण: अशोक खरात याच्याविरोधात तपास अधिक तीव्र

प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी या तीन गावांसाठी टँकर मंजुरीचे आदेश जारी केले. त्यानुसार बुधवारपासून बहिरवाडी व इमामपूर या दोन गावांसाठी टँकर सुरू झाले आहेत. या दोन गावांतील 2 हजार 140 लोकसंख्येसाठी एक टँकर धावत आहेत. गेल्या वर्षी याच तालुक्यात 6 टँकर धावत होते.

Water Tanker
Ahilyanagar Police Action: अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; गोवंश कत्तल प्रकरणातील 6 टोळ्या हद्दपार

गेल्या वर्षी 38 टँकरची नोंद

गेल्या वर्षी 9 एप्रिल 2025 रोजी पारनेर शहरासह पारनेर तालुका, संगमनेर, अहिल्यानगर, पारनेर पाथर्डी या चार तालुक्यांत 38 टँकर सुरू होते. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील सर्वाधिक अकरा तर पारनेर शहरातील चार टँकरचा समावेश होता. पारनेर शहरातील पाच हजार लोकसंख्येचा एप्रिल महिन्यातच घसा कोरडा पडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news