Ahilyanagar Crop Loss Rain: अवकाळी पावसाचा अहिल्यानगर जिल्ह्यात कहर; 127 गावांतील पिकांचे मोठे नुकसान

4,797 हेक्टर क्षेत्र बाधित; 7,384 शेतकरी संकटात, राहुरी तालुक्याला सर्वाधिक फटका
Hailstorm Crop Damage
Hailstorm Crop DamagePudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यात गुरुवारी (दि.2) झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अकोले, कोपरगाव, राहाता, संगमनेर, राहुरी, शेवगाव, जामखेड व पारनेर या आठ तालुक्यांतील 127 गावांना तडाखा बसला आहे. या तडाख्यात 4 हजार 797.16 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका 7 हजार 384 शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानीचा फटका राहुरी तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 780 हेक्टर पिकांना बसला आहे.

Hailstorm Crop Damage
Ahilyanagar Fake Milk Racket: अहिल्यानगरात बनावट दुधाचा मोठा भंडाफोड; 41 आरोपी, 7 जणांना अटक

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा कहर सुरुच असून, गुरुवारी (दि.2) कृषी विभागाने अवकाळी पावसाने झालेल्या रब्बी पिके आणि फळबागांच्या नुकसानीची पाहणी करुन शासनाला प्राथमिक अहवाल पाठविला आहे. या अहवालानुसार अकोले तालुक्यातील 32 गावे, कोपरगाव तालुक्यातील 24, संगमनेर तालुक्यातील 18, जामखेड तालुक्यातील 20, राहुरी तालुक्यातील 14, पारनेर तालुक्यातील 6 तर राहाता तालुक्यातील 11 गावांना अवकाळीचा फटका बसला आहे.

Hailstorm Crop Damage
Ashok Kharat Scam: भोंदू अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; बनावट खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार उघड

या पावसाने मका, भाजीपाला, कांदा, गहू, बाजरी, हरभरा, भुईमूग आदी पिकांबरोबरच डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, आंबा आदी फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 4 हजार 797.6 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, यापैकी 4 हजार 730.96 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news