Ahilyanagar Police Transfers: अहिल्यानगर पोलिस दलात मोठे फेरबदल; १३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ, काहींच्या बदल्या अमान्य; जिल्ह्याबाहेर बदली तर नवीन अधिकारी अहिल्यानगरमध्ये दाखल, स्थानिक बदल्यांचीही चर्चा
Police
Police Pudhari
Published on
Updated on

नगर: नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक अशा १३७ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या बदलीला एक वर्ष स्थगिती दिली तर काही अधिकाऱ्यांची बदली अमान्य करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. तर काही अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहेत.

Police
Ahilyanagar Vehicle Arson: अहिल्यानगरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीत तिघे संशयित

अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम व संजय सोनवणे यांची अहिल्यानगरहून जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. तर, जळगाव येथून पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि उध्दव डमाळे अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आले आहेत. पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, किरण शिंदे यांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे.

Police
Panodi Water Crisis: निळवंडेचा कालवा गावातून, तरी पानोडीकरांना पाण्यासाठी वणवण; ग्रामस्थांचा संताप

पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांची जळगाव येथे, आशिष शेळके यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. तर, जळगाव येथून शंकर मुटेकर व प्रदीप एकशिंगे, नाशिक ग्रामीण येथून चेतन लोखंडे आणि विकास ढोकरे अहिल्यानगर येथे बदलून आले आहेत. तर, गणेश अहिरे यांची बदली अमान्य केली आहे.

Police
Maharashtra Hailstorm Damage: अहिल्यानगर, संगमनेर, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याचा कहर

पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या (कंसात बदली ठिकाण) : फराहनाज पटेल (अमान्य), चंद्रभान जाधव (नाशिक ग्रामीण), शलमोन सातपुते (अमान्य), अनंत सालगुडे, प्रियंका आठरे, रणजीत मारग, मनोज मोंढे, सचिन लिमकर (मुदतवाढ), तुषार धाकराव, उमेश पतंगे (नाशिक ग्रामीण), संदीप ढाकणे (धुळे), संपत कन्हेरे (जळगाव). तसेच पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, गणेश कुटे, किरण जगदाळे, किरण कोठुळे, किशोर जाधव, गणेश आघाव, समाधान सोळुंके, परसराम तागड, अमोल गर्जे, सुहास आव्हाड, संदीप दरवडे, विजयकुमार कोठावळे हे अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आले आहेत.

Police
Solar Project: वादळाने मनपाचा सौरऊर्जा प्रकल्प कोलमडला; महापालिकेला फटका

लवकरच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी नाशिक परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. आता पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडूनही जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या दोन ते चार दिवसांत बदल्या केल्या जाणार असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. पोलिस ठाण्याच्या अनेक प्रभारी अधिकाऱ्यांची मुदत संपली आहे. तर, अनेकांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरल्याने त्यांची नावे बदलीच्या यादी असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news