Ahilyanagar Vehicle Arson: अहिल्यानगरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीत तिघे संशयित

दोन आलिशान कार जळून खाक झाल्यानंतर दुचाकीलाही लक्ष्य; घातपाताचा संशय बळावला, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी
Ahilyanagar Vehicle Arson
Ahilyanagar Vehicle ArsonPudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर शहरातील शनी चौक परिसरातील गुजर गल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांना आग लावल्याचा प्रकारसमोर आला आहे. काल मध्यरात्री गौरव विनायक कुलकर्णी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन आलिशान मोटारकारला आग लावून जाळण्यात आल्या. या घटनेची धग कायम असतानाच आज पुन्हा त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने हा प्रकार अपघाती नसून पूर्वनियोजित घातपाताचा कट असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahilyanagar Vehicle Arson
Panodi Water Crisis: निळवंडेचा कालवा गावातून, तरी पानोडीकरांना पाण्यासाठी वणवण; ग्रामस्थांचा संताप

अधिक माहिती अशी, शहरातील गुजर गल्ली येथे गुरूवारी रात्री मध्यरात्री गौरव कुलकर्णी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या अलिशान चारचाकी वाहनांना आग लावण्यात आली. त्यात दोन्ही वाहने जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा मध्यरात्री त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

Ahilyanagar Vehicle Arson
Maharashtra Hailstorm Damage: अहिल्यानगर, संगमनेर, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याचा कहर

या सलग घडणाऱ्या घटनांमुळे कुलकर्णी कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, तीन संशयितांच्या हालचाली वाहनाजवळ स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रकार नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Ahilyanagar Vehicle Arson
Solar Project: वादळाने मनपाचा सौरऊर्जा प्रकल्प कोलमडला; महापालिकेला फटका

या घटनेची गंभीर दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.

Ahilyanagar Vehicle Arson
Ahilyanagar Green City: पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेस प्रारंभ; शहरात एक लाख वृक्षारोपण करणार

आरोपींना तत्काळ अटक करा: जगताप

अशा प्रकारच्या घटना घडविणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news