Ahilyanagar Gambling Raid: नगरमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; 6.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

बोल्हेगाव, नवनागापूर परिसरात धडक कारवाई; अनेक जुगार अड्डे उद्ध्वस्त, आरोपींवर गुन्हे दाखल
 Gambling
GamblingPudhari
Published on
Updated on

नगर: शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. नवनागापूर, बोल्हेगाव परिसरात चार ठिकाणी रविवारी (दि.10) संध्याकाळी छापे घालून जुगार अड्डे व बिंगो अड्ड्यांचा पर्दाफाश केला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 6 लाख 35 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

 Gambling
Kopargaon Onion Price Crisis: कोपरगावात कांदा उत्पादक संकटात; दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुलगीर यांनी पोलिस पथकास कारवाईसाठी रवाना केले. पोलिस पथकास 10 मे शहरात विविध ठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने बोल्हेगाव परिसरातील आंबेडकर चौक येथे जुगार अड्ड्यावर छापा घालून 5,300 रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन व अन्य साहित्य असा एकूण 1 लाख 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 Gambling
Shrigonda Robbery Case: श्रीगोंद्यात वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; 85 हजारांचे सोन्याचे दागिने लुटले

त्यानंतर शेंडी बायपास वरील दुध डेअरी चौकात बिंगो जुगार अड्डयावर छापा घालून 9 जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 40,600 रुपये रोख व अन्य साहित्य एकूण 2,36,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. शेंडी बायपास रस्त्यावरील हॉटेल भाग्यश्री शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा घालून 5 जणांना ताब्यात घेतले.

 Gambling
Jamkhed News: जामखेड-खर्ड्यात हृदयद्रावक घटना; आई व दीड वर्षीय मुलाचा विहिरीत मृतदेह

त्यांच्याकडून 21,000 रुपये रोख, डेल कंपनीचा सी.पी.यु., जिओ कंपनीचा मॉनिटर, आकड्यांचे बॅनर्स, 2 आयफोन लॅपटॉप आणि 3 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 41 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नवनागापूर येथील दुध डेअरी चौकात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालून 4 जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून 2,850 रुपये रोख व अन्य साहित्य 1 लाख 28,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी व तोफखाना पोलिस ठाण्यात सहा लाख 35 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 Gambling
Ahilyanagar Heat Wave: नगर जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमान 42 अंशांवर

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, योगेश पवार, निसार शेख, पोलिस अंमलदार रवींद्र टकले, दीपक शिंदे, नंदकुमार पठारे, प्रमोद लहारे, इस्मॉईल पठाण, रामनाथ डोळे, कैलास शिरसाठ व पोपट देव्हारे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news