Shrigonda Robbery Case: श्रीगोंद्यात वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; 85 हजारांचे सोन्याचे दागिने लुटले

कोळगाव येथे मध्यरात्री दरोडेखोरांचा हल्ला; पती गंभीर जखमी, पुण्यात उपचार सुरू
robbery case
robbery casePudhari
Published on
Updated on

श्रीगोंदा: तालुक्यातील कोळगाव दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत 85 हजारांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. या हल्ल्यात दत्तात्रय गवळी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि. 11) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात नवनाथ दत्तात्रय गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

robbery case
Jamkhed News: जामखेड-खर्ड्यात हृदयद्रावक घटना; आई व दीड वर्षीय मुलाचा विहिरीत मृतदेह

फिर्यादी यांचे आई-वडील कौशल्याबाई आणि दत्तात्रय हे कोळगाव शिवारातील आठखांब मळा येथील शेतात भुईमुगाच्या पिकाची राखण करण्यासाठी गेले होते. सोमवारी पहाटे 1च्या सुमारास दोन अज्ञात तरुण (अंदाजे वय 18 ते 20) त्या ठिकाणी आले. दरोडेखोरांनी सुरुवातीला कौशल्याबाई यांना लाकडी काठीने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनिमंगळसूत्र आणि कानातील दागिने बळजबरीने ओरबाडून घेतले.

robbery case
Ahilyanagar Heat Wave: नगर जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमान 42 अंशांवर

या वेळी पती दत्तात्रय गवळी यांनी प्रतिकार केला असता, आरोपींनी त्यांच्या डोक्यात आणि पाठीवर लोखंडी हत्याराने जबर प्रहार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या दरोड्यात चोरट्यांनी 70 हजारांचे दोन तोळे वजनाचे मनिमंगळसूत्र आणि दोन ग्रॅम वजनाचे 15 हजारांची सोन्याची कर्णफुले असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

robbery case
Jamkhed Highway Accident: जामखेड महामार्ग अपघातात तरुण वकिलासह दोघांचा मृत्यू

घटनेनंतर जखमी अवस्थेत कौशल्याबाई यांनी घर गाठून मुलाला माहिती दिली. दत्तात्रय गवळी यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

robbery case
Ahilyanagar Onion Farmers Crisis: नगर तालुक्यात कांदा साठवणीची धावपळ; उन्हाच्या तडाख्यात शेतकरी त्रस्त

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी नंदकुमार सोनवलकर यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक मोहन गाजरे या प्रकरणाचा तपास करत असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news