Nagar Palika Counting Postponed: उमेदवारांची घालमेल वाढली! मतदानयंत्रं १८ दिवस स्ट्राँग रूममध्ये बंद; नगर जिल्ह्यातील ८ नगरपालिकांची मतमोजणी लांबणीवर

मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत रांगा, 'लक्ष्मी दर्शन'ची चर्चा; संगमनेर, राहुरीसह अनेक ठिकाणी उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमकी.
Election Vote Counting Postponed
Election Vote Counting PostponedPudhari
Published on
Updated on

नगर : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांची मतमोजणी 3 डिसेंबरऐवजी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी लांबणीवर पडल्यामुळे उमेदवारांची घालमेल वाढणार आहे. मतदानयंत्र स्ट्राँगरुमध्ये कडक पहाऱ्यात ठेवण्यात आली आहेत.

Election Vote Counting Postponed
Ambegaon Onion Planting Machine: आंबेगावात मशीनद्वारे कांदा लागवड! मजूरटंचाईवर मात, शेतकऱ्यांची श्रम व वेळेची बचत

क्षणचित्रे मतदानाची...

जामखेड

- रात्री उशिरापर्यंत मतदान

- सरासरी 75 टक्के मतदानाचा

- पहिल्यांदाच अटीतटीची निवडणूक

शेवगाव

- सरासरी 68.9 टक्के मतदान.

- 97 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद

Election Vote Counting Postponed
Burud Galli Fire Ahilynagar: बुरुड गल्लीत आगीचे तांडव! ऐतिहासिक तीन मजली इमारत बेचिराख; स्फोटाच्या आवाजाने घटनेबद्दल संशय

श्रीगोंदे

- रात्री नऊपर्यंत मतदारांच्या रांगा

- सुमारे सत्तर टक्के मतदान

- लक्ष्मी दर्शन झाल्याने गर्दी वाढल्याची चर्चा

- गोडाऊनला सशस्त्र पहारा

राहाता

- सरासरी 78 टक्के मतदान

- तीन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड

- सुमारे 78.47 टक्के मतदानाचा अंदाज

- मतदान केंद्र शोधताना मतदारांची धावपळ

Election Vote Counting Postponed
Parner Leopard Attack Death: पारनेर हादरले! शेतात काम करणाऱ्या ७० वर्षीय महिलेला बिबट्याने फरफटले; परिसरात दहशत, ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

राहुरी

- सरासरी 72 टक्के मतदान

- थंडीच्या कडाक्याने मतदानाचा टक्का घरसला

- रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच

- शनि मंदिर परिसरामध्ये उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक

- चौरंगी लढतीने भरले रंग

संगमनेर

- सरासरी 72.75 टक्के मतदान

- अँग्लो उर्दू हायस्कूल मतदान केंद्र परिसरात दोन गटात हमरीतुमरी

- साडेसातपर्यंत मतदारांच्या रांगा

- माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे व आमदार अमोल खताळ या तिघांची प्रतिष्ठा पणाला

श्रीरामपूर

- 65 टक्के मतदानाचा अंदाज

- आठ ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर रांगा

- दोन/तीन ठिकाणी उमेदवार समर्थकांमध्ये बाचाबाची

- तीन ठिकाणी रोकड पकडली

शिर्डी

- एका केंद्रावर प्रदत्त मतदान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news