

श्रीगोंदा: आगामी नगरपरिषदेची निवडणूक ही महायुतीतील घटक पक्षांमध्येच होणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत असणार आहे. अर्थात त्या दृष्टीने नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
आ.विक्रम पाचपुते यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसते. शहरातील जुन्या नगरसेवकासोबत नवीन काही इच्छुक उमेदवारांशी त्यांच्या यंत्रणेने संपर्क वाढवला आहे.तर दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांनी शहरात संपर्क वाढवला आहे. (Latest Ahilyanagar News)
नव्या प्रभागरचने नुसार आता श्रीगोंदा नगरपरिषदेची प्रभाग संख्या नऊ वरून अकरा झाली आहे. संख्येत तीनने वाढ झाली असून ती संख्या बावीस झाली आहे.
नवीन झालेल्या प्रभागरचनेनुसार प्रभाग क्र.1 लोकसंख्या एकूण - 2768 असून यामध्ये उत्तर दिशेला - घोटवी शिव रस्ता ते वडळी रोड पर्यंत तर पूर्वेला -घोटवी शिव ते वडळी रस्त्याने शनि चौकापर्यंत तर दक्षिणेला शनी चौक आणि नायरा पेट्रोल पंप तर पश्चिमेला - नायरा पेट्रोल पंप ते देवीचे मंदिरापासून पुढे दत्तवाडी वरून घोटवी शिवेपर्यंत प्रभाग सीमा आहे.
प्रभाग क्र.2 मध्ये लोकसंख्या.2884 असून उत्तरेला- वडळी शिव बेलवंडी कोठार रस्त्याने मांडवगण रस्त्यापर्यंत,पुर्व- मांडवगण रस्त्याने बोरूडे यांचे शॉपिंग सेंटर पासून शेळके यांचे घराजवळून इंगळे यांच्या घरपर्यंत जोधपुर मारुती रस्तालगत,दक्षिण- इंगळे यांच्या पासून जोधपुर मारुती रस्तापासून शनि चौकापर्यंत,पश्चिम- शनि चौकापासून वडळी रस्त्याने वडळी शिवेपर्यंत.
प्रभाग क्र.3 मध्ये 2673 इतकी लोकसंख्या आहे त्याचे सीमांकन उत्तर- मांडवगण रोडपासून घुगल वडगाव शिव ते आढळगाव रोडपर्यंत शिव रस्त्याने,पुर्व- आढळगाव शिवेपासून आढळगाव रस्त्याने बाजारतळापर्यंत,दक्षिण- बाजारतळापासून दत्त मेडिकल पर्यंत तर पश्चिम- दत्त मेडिकल पासून कुरेश नगर, ताडे यांचे घरापासून जय मल्हार मटन दुकानासमोरून बाजारतळ वेशीपासुन झेंडा चौक कासार गल्ली मार्गे बगाडे डॉक्टर यांचे घराजवळून आमले यांचे घरापर्यंत ते रोहिदास चौक मार्गे दिल्ली वेस ते मांडवगन रस्त्याने घुगल वडगाव शिवपर्यंत
प्रभाग 4 मध्ये 3032 लोकसंख्या असून याचे सीमांकन उत्तर- आंबेडकर चौक ते आढळगाव रोडने आढळगाव शिवेपर्यंत,पुर्व- आढळगाव शीव ते घोडेगाव रोड,दक्षिण- घोडेगाव रोड ते मिशन बंगल्याचा मागील बाजूने ससाणे नगरमार्गे गावठाणातून जामखेड रस्ता लेंडी नाल्यापर्यंत,पश्चिम- जामखेड रस्ता लेंडी नाल्यापासून आंबेडकर चौकापर्यंत.
प्रभाग क्र 5 मध्ये 2610 लोकसंख्या असून सीमांकनानुसार उत्तर- बगाडे डॉक्टर यांचे घरापासून आमले यांचे घरापासून जुनी सेंट्रल बँक ते रोकडोबा चौक मार्गे काळकाई चौकापर्यंत,पुर्व- दत्त मेडिकल पासून कुरेश नगर ताडे यांचे घरापासून जय मल्हार मटन दुकानासमोरून बाजारतळ वेशीपासुन झेंडा चौक कासार गल्ली मार्गे बगाडे डॉक्टर यांचे घरापर्यंत,दक्षिण- दौंड- जामखेड रस्ता आनदंकर हॉस्पिटल पासून दौंड- जामखेड रस्त्याने दत्त मेडिकल पर्यंततर पश्चिम- काळकाई चौकापासून दौंड जामखेड रस्ता आनदंकर हॉस्पिटल पर्यंत आहे.
प्रभाग क्र.6 मध्ये लोकसंख्या एकूण 2991 असून त्याचे सीमांकन उत्तर- सुतार गल्ली ते जिल्हा परिषद शाळेसमोरून संत गोरोबा गल्ली (कुंभार गल्ली) मार्गे भापकर हॉस्पिटल पर्यंत, पुर्व- जुनी सेंट्रल बँक ते रोहिदास चौक मार्गे सुतार गल्लीपर्यंत तसेच दक्षिण- काळकाई चौकापासून जुनी सेंट्रल बँक पर्यंत,पश्चिम भापकर हॉस्पिटल पासून शिंपी गल्ली मार्गे नगरपरिषद इमारतीची मागील बाजूने काळकाई चौकापर्यंत.
प्रभाग क्र 7 मध्ये 3083 लोकसंख्या असून उत्तर- शनि चौकापासून इंगळे यांच्या घराजवळून शेळके यांचे घराजवळून बोरूडे यांचे शॉपिंग सेंटर पर्यंत.पुर्व- बोरूडे यांचे शॉपिंग सेंटर ते दिल्ली वेस पर्यंत.दक्षिण- दिल्ली वेस ते जिल्हा परिषद शाळेसमोरून संत गोरोबा गल्ली (कुंभार गल्ली) मार्गे भापकर हॉस्पिटल पासून बायपास रोड सूर्यनारायण मंदिर जवळ.पश्चिम- बायपास रोड सूर्यनारायण मंदिर पासून शिवाजी चौक गार्डन पासून शनि चौकापर्यंत.
प्रभाग क्र.8 मध्ये 2910 लोकसंख्या असून उत्तर- बाबूर्डी शीवेपासून पारगाव शिवेवरून घोटवी शीवेपर्यंत.पुर्व- पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी बाबूडर्डी फाटा ते देवीचे मंदिरापासून पुढे दत्तवाडीवरुन घोटवी शीवेपर्यंत.दक्षिण- पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी बाबूर्डी फाटा.पश्चिम- पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी ते बाबूर्डी रोडने बाबुर्डी शिवेपर्यंत.
प्रभाग क्र 9 मध्ये 2692 लोकसंख्या असून उत्तर - पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी ते बाबूर्डी रोड ने बाबुर्डी शिवेपर्यंत. पश्चिम- स्टेशन रोड शिव ते म्हतार पिंप्री शिवेने बाबूर्डी शिवेपर्यंत.प्रभाग क्र.10 मध्ये 2748 लोकसंख्या असून उत्तर- महात्मा फुले चौकापासून काटी रोडने पाण्याच्या चारीने स्टेशन रोडपर्यंत. पश्चिम- काष्टी रोड लिपणगाव शिवेपासून स्टेशन रोड शिवेपर्यंत. प्रभाग क्र. 11 मध्ये 2703 लोकसंख्या असून उत्तर घोडेगाव रोड ते मिशन बंगल्याचा मागील बाजूने ससाणे नगरमार्गे - गावठाणातून जामखेड रस्त्याने महात्मा फुले चौक पेडगाव रोड पर्यंत. पश्चिम- पेडगाव रोडने चोराची वाडी शिवेपर्यंत.