Ahilyanagar Municipal Corporation: अहिल्यानगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 22 विषयांवर चर्चा; विकास प्रकल्पांसाठी कर्जाचा प्रस्ताव

नेहरू मार्केट, रंगभवन आणि व्यापारी संकुलांसह शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांवर धोरणात्मक निर्णय अपेक्षित
Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर महापालिका नेहरू मार्केटच्या जागेवर नवीन सुसज्ज इमारत बांधत आहे. तर, रंगभवन येथे व्यापारी संकुल उभारणार आहे. मात्र, त्यासाठी स्व हिस्सा भरण्यासाठी निधी नसल्याने महापालिका वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणार आहे. या विषयासह बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत 22 विषयावर सर्वसाधारण चर्चा होऊन धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.

Ahilyanagar Municipal Corporation
Ashok Kharat: शिर्डी फसवणूक प्रकरण; अशोक खरातला न्यायालयीन कोठडी, नाशिक कारागृहात रवानगी

अहिल्यानगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 15) दुपारी राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी नगरसचिव विभागाने 22 विषयांची विषय पत्रिका प्रसिद्ध केली असून, यात शहरातील महत्त्वाचे विकास प्रकल्प, नामकरण व धोरणात्मक निर्णयांचा समावेश आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Shrirampur Baba Fraud Case: भोंदू बाबाचा पर्दाफाश; 16 लाखांची फसवणूक व अत्याचार प्रकरणात अटक

सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाच्या मालकीच्या जागेत आणि गंजबाजार येथे नवीन व्यापारी संकुल विकसित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. नेहरू मार्केट, रंगभवन सर्जेपुरा येथील नियोजित नाट्यगृह, व्यापारी संकुल व बहुमजली वाहनतळ उभारणीसाठी, तसेच भुयारी गटार योजना टप्पा-2 च्या निधीसाठी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याबाबत चर्चा होईल.

Ahilyanagar Municipal Corporation
Dharmaveer Gad Development: धर्मवीर गडाच्या संवर्धनासाठी 200 कोटींचा आराखडा; पर्यटन नकाशावर झळकणार ऐतिहासिक गड

प्रभाग 14 मधील चाणक्य चौक सुशोभिकरण करण्याऐवजी भोसले लॉन चौक सुशोभिकरण करण्याबाबत विचार केला जाणार आहे. तसेच, भारत गॅस रिसोर्सेस लि. यांना गॅस पाईपलाईनसाठी रस्ता खोदाई परवानगी देणे, विविध विकास कामांच्या सुरक्षा अनामत रकमा परत करणे यांसारख्या विषयांचाही यात समावेश आहे. महिलांसाठीच्या 33 टक्के आरक्षण अंमलबजावणीस विरोध करणाऱ्यांचा निषेध करण्याचा ठराव देखील या सभेत मांडला जाणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation
Ahilyanagar Gambling Raid: रेल्वे स्टेशन रोडवर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 18 जण ताब्यात

नामकरणाचा विषय अजेंड्यावर

प्रभाग एकमधील भिस्तबाग महालाच्या रिंग रोडच्या सर्व चौकांना संग्राम चौक व परिसरास बारस्कर नगर भिस्तबाग महाल परिसर असे नाव देण्याचा प्रस्ताव अजेंड्यावर आहे. त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news